नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे मोर्चाचे आयोजन

By Suyog.joshi | Updated: October 20, 2023 12:32 IST2023-10-20T12:31:52+5:302023-10-20T12:32:27+5:30

यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसैनिक, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Shiv Sena Thackeray group organizes march against drugs in Nashik | नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे मोर्चाचे आयोजन

नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे मोर्चाचे आयोजन

नाशिक : नाशिकनगरीला ड्रग्ज माफियांच्या विळख्यापासून वाचविण्यासाठी तसेच वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत  मोर्चास प्रारंभ झाला. 

यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसैनिक, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.  शालिमार चौक येथून मार्चास प्रारंभ झाला.  गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये अंमलीपदार्थाचा वापर वाढत असून तो रोखण्यासाठी हा मोर्चा असल्याचे संयोजकांनी सांगितले. मोर्चात सहभागी शिवसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शाळकरी मुलांनी ड्ग्जविरोधातील वेगेवगळे पोस्टर्स दाखवून निषेध व्यक्त केला.

Web Title: Shiv Sena Thackeray group organizes march against drugs in Nashik