शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
2
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
3
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
4
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
5
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
6
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
7
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
8
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
9
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
10
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
11
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
12
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
13
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
14
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
15
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
16
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
17
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
18
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
19
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
20
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"

“लोकसभेसाठी उमेदवारीची संधी मिळो अन् विजय प्राप्त होवो”; हेमंत गोडसेंचे रामचरणी साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 2:15 PM

Hemant Goadse News: गेल्या १० वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत. नाशिकमध्ये प्रभू रामचंद्राचे धनुष्यबाण निवडून येईल, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.

Hemant Goadse News: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही तास राहिले आहेत. अशा परिस्थितीत महायुतीच्या सर्व जागांवरील उमेदवार किंवा जागावाटप पूर्ण झालेले दिसत नाही. नाशिकसह अन्य काही जागांवर महायुतीचे घोडे अडलेले दिसत आहे. यातच रामनवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात श्रीरामांचे दर्शन शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी घेतले. यावेळी उमेदवारीची संधी मिळू दे, यश प्राप्त होऊ दे, असे साकडे घातले, अशी माहिती हेमंत गोडसे यांनी दिली.

महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवारां निवडून यावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे देशाची मोठी प्रगती होत आहे. पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्याची संधी मिळू दे. आपल्यालाही उमेदवारीची संधी मिळू दे आणि विजय प्राप्त होऊ दे. यश मिळू दे, असे साकडे काळाराम मंदिरात दर्शन घेताना घातले, असे हेमंत गोडसे यांनी सांगितले. 

नाशिकचे जागावाटप एक ते दोन दिवसांत निश्चित होईल

नाशिकचे जागावाटप एक ते दोन दिवसांत निश्चित होईल. एक सकारात्मक निर्णय होईल. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. विद्यमान खासदार म्हणून जनसंपर्क ठेवला आहे. गेल्या १० वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत. संघटनात्मक बांधणी उत्कृष्ट पद्धतीने झाली आहे. म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे धनुष्यबाण निवडून येईल, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, हेमंत गोडसे काळाराम मंदिरात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हेही तेथे पोहोचले. यावेळी हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. यावर बोलतना हेमंत गोडसे यांनी सांगितले की, ज्येष्ठांचे आशिर्वाद घेणे ही मराठी संस्कृती आहे. रामजन्मोत्सवानिमित्त काळाराम मंदिरात आलो असताना योगायोगाने छगन भुजबळ यांची भेट झाली. मराठी संस्कृतीप्रमाणे ज्येष्ठांचे आशिर्वाद मिळावे, म्हणून त्यांच्या पाया पडलो, असे हेमंत गोडसे म्हणाले.  

टॅग्स :nashik-pcनाशिकHemant Godseहेमंत गोडसेShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४