नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उत्साह

By संजय पाठक | Updated: May 11, 2023 14:58 IST2023-05-11T14:58:28+5:302023-05-11T14:58:56+5:30

सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे जल्लोष स्वागत करणार

Shiv Sena Shinde group jubilation in Nashik; Excitement by the Supreme Court's decision | नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उत्साह

नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उत्साह

संजय पाठक

नाशिक-  सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षाबाबत निर्णय दिल्यानंतर शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने शहरातील मायको सर्कल येथे जल्लोष करण्यात आला. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाशिक मध्ये येणार असून त्यांचेही जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. आज सकाळी झालेल्या जल्लोषात खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

सर्वोच्च न्यायालयात आज निकालाची सुनावणी होणार असताना शिवसेनेची बैठक सकाळी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक शिवदूत नियुक्त करण्याच्या तयारीसाठी असली तरी हे निमित्त होते. राज्य सरकार वाचणार हे स्पष्ट होताच फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

Web Title: Shiv Sena Shinde group jubilation in Nashik; Excitement by the Supreme Court's decision