हेरगिरी प्रकरणाचा शिवसेना समाचार घेईल : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:11 AM2021-07-22T04:11:29+5:302021-07-22T04:11:29+5:30

नाशिकमध्ये एका कारखान्याच्या उद‌्घाटनासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई अंबड औद्याेगिक वसाहतीत बुधवारी (दि. २१) आले होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी ते ...

Shiv Sena to cover spy case: Subhash Desai | हेरगिरी प्रकरणाचा शिवसेना समाचार घेईल : सुभाष देसाई

हेरगिरी प्रकरणाचा शिवसेना समाचार घेईल : सुभाष देसाई

Next

नाशिकमध्ये एका कारखान्याच्या उद‌्घाटनासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई अंबड औद्याेगिक वसाहतीत बुधवारी (दि. २१) आले होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सुरू असलेल्या वादाचा परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही, असे यावेळी देसाई म्हणाले.

राज्यातील कोरोनापश्चात स्थितीबाबत बोलताना त्यांनी संकटकाळात राज्य सरकार उद्योगांच्या पाठीशी उभे राहिल्याने देशात महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे, जेथे कोरोनाकाळात शंभर टक्के उद्योग सुरू होते, त्यामुळेच कोट्यवधी कामगारांचा रोजगार वाचला आणि बेकारी वाढली नाही, असा दावा देसाई यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगांसाठी कृतिदलाची स्थापना केली आहे. लहान उद्योगांसमोर अडचणी असल्या तरी केंद्र सरकारच्या पॅकेजमधून त्यांना लाभ मिळत असल्याचे देसाई यांनी सांगितले. दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत रिलायन्सचा औषधनिर्मितीचा मोठा प्रकल्प येत आहे. तिथे लसनिर्मिती करावी, अशी मागणी केली जाणार आहे.

इन्फो..

सध्या पांजरापोळच्या जागेवर सिडकोची योजना किंवा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्याची चर्चा आहे. मात्र, पांजरापोळच्या जागेवर उद्योग उभारणीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असा प्रस्ताव नसल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena to cover spy case: Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.