नाशिकरोडला शिवजयंतीचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:42 AM2021-02-20T04:42:39+5:302021-02-20T04:42:39+5:30

शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी नाशिकरोड व जेलरोड येथील शिवपुतळ्याचे शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दिवसभर ...

Shiv Jayanti celebrations on Nashik Road | नाशिकरोडला शिवजयंतीचा जल्लोष

नाशिकरोडला शिवजयंतीचा जल्लोष

googlenewsNext

शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी नाशिकरोड व जेलरोड येथील शिवपुतळ्याचे शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दिवसभर विविध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध मंडळ, संस्था व शिवभक्तांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देवळालीगाव, विहितगाव, अनुराधा चौक, अर्टीलरी सेंटररोड, जय भवानी,रोड आनंदनगर, जगताप मळा, सुभाषरोड, गोसावीवाडी, आंबेडकररोड, वास्कोचौक, बिटको चौक, दत्तमंदिररोड, गंधर्वनगरी, शिखरेवाडी, जिजामातानगर, जेलरोड शिवाजीनगर, इंगळेनगर, दसक, पंचक, सिन्नरफाटा, चेहेडी पंपिंग, मळे परिसर, आदी सर्व ठिकाणी राजकीय पक्ष, मंडळे, संस्था, संघटना व शिवभक्तांच्या वतीने प्रतिमा पूजन करून मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्वत्र भगवे झेंडे, डिजिटल फलक, विद्युतरोषणाई करुन शिवरायांवरील पोवाडे लावण्यात आल्याने सर्वत्र भगवे व मराठमोळे वातावरण निर्माण झाले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी निघणाऱ्या पालखी मिरवणुका व सायंकाळी निघणारी स्वतंत्र मिरवणूक यांना परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र सायंकाळपासून शिवाजी पुतळा येथे शिवप्रेमींची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने उपस्थित मान्यवर व शिवप्रेमींचे स्वागत करण्यात येत होते. सायंकाळपासून हजारो शिवप्रेमी महिला युवक यांनी घोषणाबाजी करत मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा केला. शिवपुतळा येथे उभारण्यात आलेल्या किल्ल्यावरून करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. शिवपुतळा येथे सायंकाळी झालेल्या गर्दीमुळे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला होता.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ , आमदार राहुल ढिकले, सरोज आहिरे , माजी मंत्री बबनराव घोलप, प्रभाग सभापती जयश्री खर्जुल, माजी आमदार योगेश घोलप, बाळासाहेब सानप , शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विक्रम कोठुळे, कार्याध्यक्ष राहुल बोराडे, उपाध्यक्ष निलेश कर्डिले, उपाध्यक्ष संतोष वाकचौरे, सरचिटणीस राजेश आढाव, राहुल निस्ताने, कृष्णा लवटे, नितीन शिंदे, किशोर जाचक, दर्शन सोनवणे, साहेबराव खर्जुल, शिवाजी हंडोरे, नितीन खर्जुल, राजेश फोकणे, विकास भागवत, संतोष क्षिरसागर, हेमंत गायकवाड, विक्रम कदम, बंसर्व आजी माजी नगरसेवक सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवप्रेमी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

३१० रक्तदात्यांचे रक्तदान

शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने शिवाजी पुतळा येथे शुक्रवारी विविध चार रक्तपेढ्याचे संयुक्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. दिवसभरामध्ये ३१० शिवप्रेमींनी रक्तदान करून केले.

Web Title: Shiv Jayanti celebrations on Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.