शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

शिखर बॅँकेसाठी शिरीषकुमार कोतवालांचा ठराव संमत

By admin | Updated: June 26, 2015 01:18 IST

शिखर बॅँकेसाठी शिरीषकुमार कोतवालांचा ठराव संमत

नाशिक : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँक (शिखर बॅँक) निवडणुकीला मतदान करण्याचा व उभे राहण्याचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून निवडायच्या प्रतिनिधी पदासाठी चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नावाचा ठराव संमत करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सभागृहात विशेष बैठक बोेलविण्यात आली होती. बैठकीस अध्यक्ष नरेंद्र दराडे, उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्यासह सर्व १९ संचालक उपस्थित होते. विषय पत्रिकेवर राज्य शिखर बॅँकेसाठी मतदान करण्यासाठी व शिखर बॅँकेच्या निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी प्रतिनिधी पाठविण्याचा विषय होता. सुरुवातीला या प्रतिनिधी पदासाठी माजी अध्यक्ष परवेज कोकणी व सचिन सावंत हे दोन्ही इच्छुक होते. या उमेदवारीवरून दोघांमध्ये बैठकीतच काही वेळ शाब्दिक चकमक उडाल्याचे समजते. एकमताने एकच नाव ठरविण्याबाबत सर्वच संचालकांची चर्चा सुरू होती. अखेर एकमत न झाल्याने या प्रतिनिधी पदासाठी निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. सचिन सावंत व शिरीषकुमार कोतवाल हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात होेते. त्यात शिरीषकुमार कोतवाल यांना त्यांचे स्वत:च्या मतासह अध्यक्ष नरेंद्र दराडे, किशोर दराडे, केदा अहेर, धनंजय पवार, अ‍ॅड. संदीप गुळवे, नामदेव हलकंदर, आमदार जे. पी. गावित, आमदार अनिल कदम, गणपतराव पाटील, शिवाजी चुंबळे व परवेज कोकणी यांनी मतदान केले. विरोधात उभ्या असलेल्या सचिन सावंत यांनीही कोतवाल यांना मतदान केले. सचिन सावंत यांना उपाध्यक्ष सुहास कांदे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार अपूर्व हिरे, माणिकराव कोकाटे, अद्वय हिरे, डॉ.शोभा बच्छाव व दिलीप बनकर अशी आठ मते मिळाली.