शिराळे शाळेचा दप्तरमुक्त शनिवार उपक्रम ठरतोय प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 03:15 PM2020-01-20T15:15:58+5:302020-01-20T15:16:06+5:30

पेठ -तालुक्यातील शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तर मुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्र म राबवले जात आहेत.

 Shirale School's free Saturday activities are becoming inspiring | शिराळे शाळेचा दप्तरमुक्त शनिवार उपक्रम ठरतोय प्रेरणादायी

शिराळे शाळेचा दप्तरमुक्त शनिवार उपक्रम ठरतोय प्रेरणादायी

Next

पेठ -तालुक्यातील शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तर मुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्र म राबवले जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्या संकल्पनेतून दप्तर मुक्त शनिवार हा उपक्र म राबवण्यात येत आहे. मुख्याध्यापक गंगाराम पाडवी, शिक्षक संजय सुसलादे यांच्यातर्फे दर शनिवारी मुलांसाठी बौध्दीक मेजवाणी ठरलेली असते. दैनंदिन अभ्यासाबरोबरच शालेय उपक्र मात मुलांनी सहभागी होऊन सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने राखी तयार करणे, मातीकाम, अवांतर वाचन, परसबाग स्वछता, ग्राम स्वच्छता, भेळ तयार करणे,प्राकृतिक भुरु पे,भेटकार्ड तयार करणे,डबा मनोरंजनाचा,खिजनाशोध,,पर्ण कोलाज,पुष्पगुच्छ तयार करणे,चित्र रंगवणे,दही हंडी कागदी फुल तयार करणे,हळदी कुंकू,शब्दात लपलय कोण,भाषिक खेळ,गणतिी कोडे,भाषिक कोडे यासारखे उपक्र म राबवले जातात. विशेष बाब म्हणजे शालेय विद्यार्थी प्रत्येक उपक्र मात आनंदाने सहभागी होतात. सभापती विलास अलबाड, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, केंद्र प्रमूख रामदास शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहुदास आदींनी शिराळे शाळेला भेट दिली.

Web Title:  Shirale School's free Saturday activities are becoming inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक