पेठसाठी शिराळे धरणातून् होणार पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:37 IST2020-10-14T22:26:26+5:302020-10-15T01:37:59+5:30
पेठ - शहराची वाढती लोकसंख्या व आधुनिकीकरणाचा विचार करून शिराळे धरणातून जवळपास 13 कोटीची वाढीव नळ पाणीपूरठा योजना मंजूरीच्या ...

पेठच्या वाढीव पाणीपूरवठा मंजूरी बाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत सहभागी उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील , कृषी मंत्री दादा भूसे आदी.
पेठ - शहराची वाढती लोकसंख्या व आधुनिकीकरणाचा विचार करून शिराळे धरणातून जवळपास 13 कोटीची वाढीव नळ पाणीपूरठा योजना मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आली असून याबाबत मंत्री गटाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषीमंत्री दादा भूसे यांनी पेठ पाणीपूरठा योजनेला शासनाने मंजूरी द्यावी अशी मागणी केली. पेठ शहराचे गत पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत मधून नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्याने शहराची दरडोई पाण्याची मागणी वाढली असून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत १३ कोटी ३६ लाख ५९ हजार रुपयाच्या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे. मंगळवारी भूसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार , पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेसोबत झालेल्या बैठकीत सदरच्या योजनेस विशेष बाब म्हणून मंजूरी द्यावी अशी मागणी केली . यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नियोजन विभागाचे अप्पर सचिव देवाशिश चक्रवर्ती, पाणीपुरवठा विभागाचे अप्पर सचिव संजय चंहांदे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल , जीवन प्राधीकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांचे सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पेठ शहर वाढीव नळपाणी पुरवठा योजनेच्या मंजूरीबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे , नगराध्यक्ष मनोज घोंगे, मुख्याधिकारी शुभम गुप्ता, जि.प. सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे सहभाग घेतला. यावेळी पाणीपुरवठा विभागासह नगरपंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.