नाशिक : गणित विषय म्हणजे मुलांसाठी डोकेदुखीच पण तेच जर मनापासून केले तर हा विषय नक्कीच आवडता होतो. हाच संदेश देत नाशिकच्या सेंट फ्राँसिस स्कूलमधील १३ वर्षाच्या समृद्धी शिंदे या विद्यार्थिनीने तुर्की येथे झालेल्या ‘मेमोरियाड तुर्की ओपन चॅम्पियनशिप’मध्ये यश प्राप्त करत ‘मेंटल कॅलेडंर डेट्स’ यामध्ये द्वितीय स्थान पटकाविले. शिंदे ही विद्यार्थींनी कोणत्याही मोठ्या संख्येचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, वर्गमूळ किंवा कॅलेंडरच्या तारखांचा वार यांचे क्षणात उत्तर देते. या विद्यार्थिनीने तुकर् ीत झालेल्या आंतरराष्टीय स्पर्धेत यश मिळवित नाशिकच्या लौकिकात भर घातली. आपल्या देशात गणिती आणि तार्किक गणना या मेन्टल स्पोर्ट्सला शारीरिक खेळापेक्षा कमी दर्जा दिला जातो. मात्र पाश्चिमात्य देशांमध्ये मेंटल स्पोर्ट्सला जास्त प्राध्यान देत असल्यामुळे तेथे लहान मुले आज कमी वयात वैज्ञनिक असतात. मात्र याला अपवाद ठरत गणिती आणि तार्किक गणतेत आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्कीत झालेल्या ‘मेमोरियाड तुर्की ओपन चॅम्पियनशिप’मध्ये शिंदेने दुसरे स्थान पटकाविले. यासाठी तीला रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच तिने ‘मेंटल मल्टीप्लिकेशन व मेंटल अॅडीशन’ या विषयांमध्ये खुल्या गटात अनुक्र मे ५ वे व १३ वा क्रमांक पटकाविला.
नाशिकच्या शिंदेचे तुर्की चॅम्पियनशीपमध्ये यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 16:43 IST
सेंट फ्राँसिस स्कूलमधील १३ वर्षाच्या समृद्धी शिंदे या विद्यार्थिनीने तुर्की येथे झालेल्या ‘मेमोरियाड तुर्की ओपन चॅम्पियनशिप’मध्ये यश प्राप्त करत ‘मेंटल कॅलेडंर डेट्स’ यामध्ये द्वितीय स्थान पटकाविले
नाशिकच्या शिंदेचे तुर्की चॅम्पियनशीपमध्ये यश
ठळक मुद्दे‘मेमोरियाड तुर्की ओपन चॅम्पियनशिप’मध्ये यशचॅम्पियनशिप’मध्ये शिंदेने दुसरे स्थान पटकाविले यासाठी तीला रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले