मेंढपाळ करत आहे पाणी बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:08 IST2021-04-13T20:45:44+5:302021-04-14T01:08:39+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात मेंढपाळ करताय पाणी बचत करतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मेंढपाळ करत आहे पाणी बचत
राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात मेंढपाळ करताय पाणी बचत करतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
मेंढपाळ आपल्या मेंढ्यांची तहान भागवी म्हणून ज्या शेतात मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती करत असतात. पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेत तळ्यासाठी वापर होत असलेला जाड प्लास्टिकच्या पेपराचा हौद बनवून त्यात विहिरीतून आणलेले पाणी जमा करण्यात येवून मेंढ्यांची व बैलांची तहान भागवली जाते आहे.
परिसरात कूठेही पाणी उपलब्ध नसल्यामुळे मेंढपाळाना जनावरांकरीता चारा व पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करीत मेंढपाळ जनावरांचे पालनपोषण करीत आहेत. सध्या राजापूर येथे ज्या शेतकऱ्यांची शेततळ्याच्या आधारावर असलेले उन्हाळ कांदा काढणी सूरू आहे. अश्या शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्या कांद्याची पात चारण्यासाठी जात आहेत.
ज्या शेतात मेंढ्या चारण्यासाठी जातात येथे त्यांना या प्लास्टिकच्या हौदाच्या सहाय्याने जनावरांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्या चारण्यासाठी जाताना पहिले पाणी मिळेल का तरच मेंढपाळ तेथे जात बसत आहे.
राजापूर व परिसरात उन्हाळा म्हटला कि वाड्या वस्त्यांवरील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना हा दरवर्षी करावाच लागतो. विहिरीत दहा ते पंधरा फूट पाणी शिल्लक ठेऊन उन्हाळा काढावा लागतो. व हे पाणी संपल्यावर टँकरद्वारे पाणी विकत आणून विहिरीत टाकून कुटुंबाची तहान भागवली जात आहे. प्लास्टीक कागदाच्या हौदामुळे पाणी वाया जात नाही व पाणी बचत होऊन जनावरांना पिण्याचे पाण्याची उपलब्ध केले जाते. शेतात खड्यात पाणी टाकून मेंढ्यांना पाणी उपलब्ध केले जाते, मात्र या भागात खडा करून पाणी टाकण्याइतके पाणी नसल्यामुळे पशूपालकांकडून अश्या हौदाच्या साहाय्याने पाणी बचत करीत आहे.
(१३ राजापूर)
प्लास्टिकच्या हौदाच्या साहाय्याने जनावरांना पाणी पितांना बैलजोडी.