वडाळीभोई येथे शार्टसर्किटने चारा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 17:26 IST2019-02-21T17:26:03+5:302019-02-21T17:26:28+5:30
चांदवड : तालुक्यातील वडाळीभोई येथील शिंदे रस्ता माळ वस्ती येथे राहणारे गणेश भाऊसाहेब चौधरी यांच्या शेतातील घराजवळ रचून ठेवलेला चारा (कडबा) शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. यात अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.

वडाळीभोई येथे शार्टसर्किटने चारा खाक
चौधरी यांच्या शेतातील घराजवळून वीज वितरणची मुख्य वाहिनी गेलेली आहे. याठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आगीच्या ठिणग्या जमिनीवर पडल्या. त्यामुळे जमिनीवरील गवताने पेट घेतला. यात साठवून ठेवलेला चाऱ्यानेदेखील पेट घेतला. या आगीत अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शासकीय अधिकाºयांनी भेट देऊन पंचनामा केला. यासंदर्भात वडाळीभोई पोलीस ठाण्यात अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली असून हवालदार अशोक पवार तपास करीत आहेत.