शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

एकलहरे वीज प्रकल्पासाठी शरद पवारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 7:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या सहाव्या संचाचे काम सुरू करण्यात यावे यासाठी आमदार सरोज अहिरे ...

ठळक मुद्देवीज सचिवांशी चर्चा : पुढच्या आठवड्यात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या सहाव्या संचाचे काम सुरू करण्यात यावे यासाठी आमदार सरोज अहिरे यांनी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या निवेदनाच्या आधारे शनिवारी यासंदर्भात ऊर्जा सचिव व महापारेषणच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली. याबाबत येत्या आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.

नाशिक औष्णिक विद्युत केंद्राची स्थापना १९७० मध्ये झाली. तेव्हापासून या केंद्रातून वीज निर्मिती केली जात असून, २०१० मध्ये टप्पा क्रमांक एकचे आयुर्मान पूर्ण झाल्याने तो बंद करण्यात आला. त्याबदल्यात ६६० मेगावॉटचा संच मंजूर करण्यात आला. त्यासंदर्भात महानिर्मिती कंपनीच्या संचालक मंडळाने त्याला मान्यताही दिली. सध्या केंद्रात टप्पा क्रमांक २ अस्तित्वात आहे. मेरिट आॅर्डर डिस्पॅचच्या प्रणालीमुळे एक संच कायमच रिझर्व्ह शटडाउनमध्ये बंद असतो. तसेच एका संचाचा कोळसा मे. धारिवाल कंपनीला देण्यात आला आहे. त्यामुळे तीन पैकी दोन संच बंद आहेत. परिणामी सध्या फक्त एकच संच कार्यान्वित आहे. टप्पा क्रमांक दोनमधील २१० मेगावॉट क्षमतेच्या तीनही संचांची मुदत येत्या एक-दोन वर्षात संपत असल्याने ते बंद करावे लागतील. युनिट तीनची मुदत एप्रिल २०१९ मध्येच संपलेली आहे. युनिट चारची मुदत जुलै २०२० मध्ये संपेल व युनिट पाचची मुदत जानेवारी २०२१ मध्ये संपेल. त्याच्या आत येथे मंजूर असलेल्या ६६० मेगावॉटच्या संचाचे काम सुरू होणे गरजेचे असल्याची मागणी करणारे निवेदन आमदार अहिरे यांनी शरद पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिले होते. यासंदर्भात शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकलहरेच्या प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी राज्याचे ऊर्जा सचिव व महावितरण, महापारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, सूर्यकांत पवार, निवृत्ती चाफळकर, सदाशिव अत्तरदे, संतोष जायगुडे उपस्थित होते. या बैठकीत नवीन संच कार्यरत करण्याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात येऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक