शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे व्हॉलीबॉल संघ राज्यपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 07:05 PM2019-09-28T19:05:18+5:302019-09-28T19:06:53+5:30

कळवण : जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत शिवाजी स्टेडीयम नाशिक येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघानी विभागीय पातळीवर चमकदार खेळ करीत वर्चस्व राखले.

Sharad Pawar International School's volleyball team at state level | शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे व्हॉलीबॉल संघ राज्यपातळीवर

शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे व्हॉलीबॉल संघ राज्यपातळीवर

googlenewsNext
ठळक मुद्देशाळेच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघ उपांत्यपूर्व सामन्यात

कळवण : जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत शिवाजी स्टेडीयम नाशिक येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघानी विभागीय पातळीवर चमकदार खेळ करीत वर्चस्व राखले.
या स्पर्धेत शाळेच्या १४ वर्षाआतील मुलांच्या संघाने उपांत्यपूर्व सामन्यात जळगाव संघाचा २५-१९ व २५-१७ गुणांनी पराभव केला, तर उपांत्य सामन्यात नाशिक मनपा संघास २५-१७ व २५-१८ गुणांनी धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात मालेगाव संघाचा २५-२० व २५-२२ गुणांनी पराभव करून राज्य पातळीसाठी आपली दावेदारी निश्चित केली.
तसेच या स्पर्धेत शाळेच्या १७ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने उपांत्यपूर्व सामन्यात धुळे मनपा संघाचा २५-१५ व २५-१७ गुणांनी पराभव केला, तर उपांत्य सामन्यात नंदुरबार संघाचा २५-१७ व २५-१६ गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
अतिशय रोमर्शक व अटीतटीच्या अंतिम सामन्यात जळगाव ग्रामीण संघाचा २५-२१ व २५-२३ गुणांनी पराभव करून राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली.
या संपूर्ण स्पर्धेत दोघांची व्हॉलीबॉल संघांच्या सर्व खेळाडूंनी आक्र मकतेचा समन्वय साधत संघास विजयी केले.
या संघास शाळेचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक अभय कजगावकर, कुलभूषण कुमार व प्राजक्ता आठरे यांचे मार्गदर्शन लाभले.
 

Web Title: Sharad Pawar International School's volleyball team at state level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.