शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचा क्रि केट संघ विभागीय पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 18:36 IST2019-10-15T18:35:44+5:302019-10-15T18:36:12+5:30
जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने नाशिकच्या राजे संभाजी स्टेडिअमवर घेण्यात आलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रि केट स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षांखालील क्रि केट संघाने यश मिळवत वर्चस्व राखले आहे.

शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचा क्रि केट संघ विभागीय पातळीवर
कळवण : जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने नाशिकच्या राजे संभाजी स्टेडिअमवर घेण्यात आलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रि केट स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षांखालील क्रि केट संघाने यश मिळवत वर्चस्व राखले आहे.
पवार स्कूलच्या संघाने उपांत्यपूर्व सामन्यात नांदगाव संघाला १९ धावांनी पराभूत करून उपांत्य फेरी गाठली, तर उपांत्य फेरीत त्र्यंबकेश्वर संघास नऊ विकेटने मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला.
निफाड तालुका संघासोबत झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात पवार स्कूलच्या संघाने प्रथम फलंदाजी करीत सहा षट्कात तीन गड्यांच्या मोबदल्यात ४५ धावा केल्या.
उत्तरादाखल निफाड संघ फक्त २४ धावा करू शकला. पवार स्कूलच्या संघाने २१ धावांनी विजय मिळवला. विजयी संघाची विभागीय पातळीसाठी निवड झाली. यशस्वी संघास प्रशिक्षक वासीम बारी यांचे मार्गदर्शन लाभले.