राज्यपाल शंभू महादेवाचरणी, कोश्यारींकडून श्री त्र्यंबकेश्वराला अभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 14:10 IST2022-01-31T14:07:29+5:302022-01-31T14:10:10+5:30
दर्शन रुद्राभिषेक आरती झाल्यानंतर देवस्थानच्या कोठी हॉलमध्ये देवस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाल श्रीफळ व त्र्यंबक राजाची प्रतिमा देऊन सत्कार केला.

राज्यपाल शंभू महादेवाचरणी, कोश्यारींकडून श्री त्र्यंबकेश्वराला अभिषेक
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज सोमवारी सव्वाबारा वाजता घरातील नातेवाईकांसह भगवान त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन लघुरुद्र पूजा अभिषेक केला. यावेळी पुजेचे पौरोहित्य त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी केले. त्यांना शेखर गायधनी, पराग धारणे, चेतन लोहगावकर व अक्षय लाखलगावकर या पाच ब्रम्हवृंदानी पौरोहित्य केले.
राज्यपालांसमेवत जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक (ग्रामिण) चे पोलीस अधिक्षक सचिन पाटील, इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त भूषण अडसरे, संतोष कदम, पंकज धारणे, प्रशांत गायधनी पंकज भुतडा आदी उपस्थित होते. राज्यपालांचे त्र्यंबकेश्वरला आगमन झाल्यानंतर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी रुद्राक्ष माळ आणि पुष्पबुके देऊन स्वागत केले. दर्शन रुद्राभिषेक आरती झाल्यानंतर देवस्थानच्या कोठी हॉलमध्ये देवस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाल श्रीफळ व त्र्यंबक राजाची प्रतिमा देऊन सत्कार केला.