सिन्नर तालुका केमिस्ट सोशल ग्रुपच्या अध्यक्षपदी शैलेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 16:21 IST2020-12-15T16:20:48+5:302020-12-15T16:21:47+5:30

सिन्नर : येथील श्रीनिवास मेडिकलचे संचालक शैलेश पाटील यांची सिन्नर तालुका केमिस्ट सोशल ग्रुपच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते संस्थापक अध्यक्ष अतुल झळके यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

Shailesh Patil as the President of Sinnar Taluka Chemist Social Group | सिन्नर तालुका केमिस्ट सोशल ग्रुपच्या अध्यक्षपदी शैलेश पाटील

सिन्नर तालुका केमिस्ट सोशल ग्रुपच्या अध्यक्षपदी शैलेश पाटील

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष सचिन वाळुंज, कोषाध्यक्ष राजेंद्र फटांगरे तसेच सल्लागार म्हणून राजेंद्र हांडोरे,अतुल झळके यांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण व शहरातील केमिस्टसाठी कार्यशाळा, राज्य फार्मसी कौन्सिलच्या माध्यमातून फार्मासिस्टसाठी नोंदणी शिबीर, रक्तदान, विविध रोगनिदान शिबिरे,आदर्श फार्मासिस्ट पुरस्कार,केमिस्टसाठी मोफत अपघाती विमा,फार्मासिस्ट दिन,कर्करोग दिन तसेच पाल्यांसाठी विद्यार्थी गुणगौरव समारंभ, मोफत गणवेश, वह्या पुस्तके वितरण आदि विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष शैलेश पाटील यांनी दिली. यावेळी संजय जगताप,राजेश लोणारे,गोविंद हरदास,सुनील शिंदे आदि उपस्थित होते.

Web Title: Shailesh Patil as the President of Sinnar Taluka Chemist Social Group