शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

...यंदा शहाजहांनी ईदगाह गजबजणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 7:13 PM

रमजानपर्व काळात सर्व समाजबांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन खतीब यांच्यासह धर्मगुरूंनी केले आहे.

ठळक मुद्देनमाजपठणाचा सामुहिक सोहळा रद्दगर्दी टाळा, कोरोनाला संपवा

नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान सण म्हणून ओळखला जाणारा ‘ईद-उल-फित्र’ अर्थात रमजान ईद अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे; मात्र यंदा कोरोनासारख्या भयंकर आजाराचे सावट ईदवर आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे शहरातील शहाजहांनी ईदगाह मैदानावर होणारा ईदच्या खास नमाजपठणाच्या पारंपरिक सोहळा यंदा पहावयास मिळणार नाही. कारण केंद्र व राज्य सरकारकडून सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, उत्सव रद्द करण्याचे आदेश येत्या ३१ तारखेपर्यंत देण्यात आले आहेत.कोरोना आजाराच्या संकटामुळे संपुर्ण रमजान पर्व यंदा जेमतेम उत्साहात पार पडले. बाजारपेठा फारशा गजबजलेल्या दिसल्या नाहीत. कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मागील दीड महिन्यांपासून ‘लॉकडाउन’ घोषित केले गेले आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी राज्यासह देशभरात वाढविला गेला आहे. येत्या २४ मे रोजी मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची सांगता होणार आहे. २५ तारखेला सोमवारी रमजान ईद साजरी केली जाईल. तत्पुर्वी २३ तारखेला रमजानच्या २९ व्या उपवासाच्या संध्याकाळी चंद्रदर्शन घडल्याची अधिकृत घोषणा झाली तर कदाचित रविवारी (दि.२४) रमजान ईद साजरी केली जाऊ शकते.एकूणच रमजान ईदचा मोठा सण अवघ्या पाच ते सहा दिवसांवर आला आहे; मात्र यावर्षी शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह प्रमुख धर्मगुरू व उलेमांनीदेखील ईद यंदा अगदी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. ज्याप्रमाणे रमजानपर्व काळात सर्व समाजबांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन खतीब यांच्यासह धर्मगुरूंनी केले आहे.

गर्दी टाळा, कोरोनाला संपवा...ईदनिमित्त यंदा बाजारपेठांमध्ये गर्दी उसळणार नाही, याची संपुर्ण काळजी समाजाने घ्यावयाची आहे, कारण त्याशिवाय कोरोनाला नष्ट करणे शक्य होणार नाही. यामुळे यंदा ईदच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नये, असे आवाहन आठवडाभरापासून सोशलमिडियाद्वारे केले जात आहे. याबाबत सुन्नी मरकजी सिरत समितीकडून आवाहन पत्रकदेखील खतीब यांनी प्रसिध्द केले आहे.शहाजहांनी ईदगाहवरील नमाजपठणाचा सामुहिक सोहळा शासनाच्या नियमानुसार होऊ शकत नाही. तसेच मशिदीदेखील बंदच राहणार आहेत. यंदा समाजबांधवांनी आपआपल्या घरांमध्ये राहूनच नमाजपठण (शरियतनुसार) करत ईद साजरी करावी. जेव्हा कोरोनाचे संकट आपल्या शहरातून अन् देशातून दूर होईल तेव्हा आपली खऱ्या अर्थाने ‘ईद’ होईल.- हाफीज हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-खतीब, नाशिक

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईदShajahaani Eidgahशाहजहांनी इदगाहNashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस