नाशाकत घनकरलेनमधील सर्जिकल दुकानाला भीषण आग; अग्नीशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल
By नामदेव भोर | Updated: June 18, 2023 17:58 IST2023-06-18T17:57:54+5:302023-06-18T17:58:05+5:30
अग्नीशमन दलाचे जवान आग पूर्णपणे शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.

नाशाकत घनकरलेनमधील सर्जिकल दुकानाला भीषण आग; अग्नीशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल
नाशिक : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या घनकरलेन भागातील दीपक सर्जिकलच्या मेडीकल केमिकलच्या साठ्याला रविवारी (दि.१८) सायंकाळी सव्वा पाचवाजेच्या सुमारास भीषण आग लागली. दीपक सर्जिकल हे मेडीकल साहित्य विक्रीचे दुकान मनोहर कॅम्पॅक्स या इमारतीत असून इमारतीच्या गच्चीवर ठेण्यात आलेल्या ज्वलनशील रसायनांचा साठा आगीच्या भक्षस्थानी पडल्याने इमारतीवर आगीचा भडका उडाला.
घनकर लेनमधील मनोहर कॉम्पलॅक्सच्या गच्चीवर आग लागल्याची माहिती नाशिक महापालिका अग्नीशनदलाच्या मुख्यालायात सव्वापाच वाजेच्या सुमारास मिळतात मुख्यालयातून दोन अग्नीशमन बंबासह घटनास्थळी दाखल होत वाहनचालक महेश कदम फायरमन राजेंद्र नाकील, विनेश लासुरे, वाहन चालक नाझीम देशमुख यांच्यासह प्रशिक्षणार्थी जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आग नियंत्रात येत नसल्याने पंचवटी अग्नीशमन दलाचा बंबही घटनास्थळी बोलविण्यात आला. तिन्ही बंबांच्या साह्याने अग्नशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली असली तरी अजूनगी इमारतीतून धुराचे लोळ येत असल्याने सिडकोतील अग्नीशमन दलाचा बंबही घटनास्थळी बोलविण्यात आला आहे. अग्नीशमन दलाचे जवान आग पूर्णपणे शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.