कार, रिक्षा अपघातात सात गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:14 IST2018-08-03T00:14:17+5:302018-08-03T00:14:49+5:30
औंदाणे : सटाणा - मालेगाव रस्त्यावर लखमापूर गावाजवळ साई हॉटेलजवळ टाटा माझा (एमएच १७ एए १९९३) व अॅपे (एमएच ४१ बी ८०१) रिक्षा यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात ७ गंभीर जखमी झाले.

कार, रिक्षा अपघातात सात गंभीर
औंदाणे : सटाणा - मालेगाव रस्त्यावर लखमापूर गावाजवळ साई हॉटेलजवळ टाटा माझा (एमएच १७ एए १९९३) व अॅपे (एमएच ४१ बी ८०१) रिक्षा यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात ७ गंभीर जखमी झाले.
या अपघातातील जखमींमध्ये नांदगाव (ता. मालेगाव) येथील ईश्वर अनिल हातेकर, पंकज रघुनाथ चव्हाण धांद्री (ता. बागलाण) येथील पद्माबाई दादाजी शिंदे, सुरेश लक्ष्मण चव्हाण, लहान मुलगी सीमा योगेश शिंदे, लखमापूर येथील प्रवीण पंडित लोखणे, रिक्षाचालक मोहन सुधाकर सोनवणे गंभीर जखमी झाले. जखमींना शरद वाघ यांनी प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केले. ते मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अॅपे रिक्षाचालक गंभीर जखमी असून, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.