नाशिकमध्ये पेशवेकालीन सात राहाडीत रंगला रंगोत्सव, काय आहे परंपरा?
By संजय पाठक | Updated: March 19, 2025 18:36 IST2025-03-19T18:33:58+5:302025-03-19T18:36:26+5:30
नाशिकमध्ये पेशवेकालीन सात रहाडी असून, जमिनीच्या खाली असलेले हौद रंगपंचमीच्या काही दिवस अगोदर उघडले जातात त्यांची स्वच्छता केली जाते.

नाशिकमध्ये पेशवेकालीन सात राहाडीत रंगला रंगोत्सव, काय आहे परंपरा?
-संजय पाठक, नाशिक
परंपरेनुसार नाशिक मध्ये रंगपंचमीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी मोठ्या उत्साहात रंगोत्सव साजरा करण्यात आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्यासह देशात अनेक ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. नाशिकमध्ये मात्र रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळला जातो.
या रंगपंचमीचे वैशिष्ट्य म्हणजे नाशिकमध्ये पेशवेकालीन सात रहाडी असून, जमिनीच्या खाली असलेले हौद रंगपंचमीच्या काही दिवस अगोदर उघडले जातात त्यांची स्वच्छता केली जाते.
त्यानंतर त्यात नैसर्गिक रंग तयार केले जातात रंगपंचमीच्या दिवशी सवाष्णींच्या हस्ते पूजन केले जाते तसेच मानकऱ्यांनी रितसर पूजा केल्यानंतरच रंगोत्सव साजरा करण्यात सुरुवात होते.
नाशिक शहरात बुधवारी (१९ मार्च) सकाळपासूनच विविध भागांमध्ये रंगपंचमीला सुरुवात झाली असली तरी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहराच्या मध्य भागातील राहाडीमध्ये मध्ये उत्सव सुरू झाला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अनेक ठिकाणी भेट देऊन रहाडींचे औपचारिक पूजनही केले. दरम्यान शहराच्या विविध भागात रंग खेळण्यासाठी रेन डान्स चे देखील आयोजन करण्यात आले आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मध्य नाशिक तसेच संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.