सागाच्या लाकडांसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 01:02 IST2018-08-25T01:01:42+5:302018-08-25T01:02:04+5:30
सागाच्या लाकडांची चोरी करून ती परराज्यात विक्रीसाठी नेणाऱ्या टोळीकडून हरसूल वन कर्मचाºयांनी सागाची लाकडे व चारचाकी असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल शेवगेपाडा फाट्याजवळ गुरुवारी (दि़२३) मध्यरात्री जप्त केला़

सागाच्या लाकडांसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिक : सागाच्या लाकडांची चोरी करून ती परराज्यात विक्रीसाठी नेणाऱ्या टोळीकडून हरसूल वन कर्मचाºयांनी सागाची लाकडे व चारचाकी असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल शेवगेपाडा फाट्याजवळ गुरुवारी (दि़२३) मध्यरात्री जप्त केला़
वनक्षेत्रपाल संदीप पाटील यांना गुरुवारी (दि.२३) मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास (एम.एच. १५ डी.एम. १९८२) या क्रमांकाची ट्रॅक्स क्रुझर क्लासिक या वाहनातून सागाची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी वनपरिमंडळ अधिकारी अजय शिंदे, कैलास कांबळे, कैलास पवार व ६ वनरक्षक यांना आदेश देऊन ही चारचाकी शेवगेपाडा फाट्याजवळ अडविली. वनकर्मचाºयांना पाहताच सागाची तस्करी करणाºया टोळक्याने वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले़ या वाहनात सागाच्या झाडाची १८ नग लाकडे आढळून आले. २८,८६९ रुपये किमतीची सागाची लाकडे व चारचाकी वाहन असा सुमारे तीन लाख ३० हजार रुपयांचा हा मुद्देमाल आहे. या प्रकरणी भारतीय वनअधिनियम तसेच महाराष्ट्र वननियमावली २०१४ चे कलम ५० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़