मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 00:36 IST2019-12-06T00:36:05+5:302019-12-06T00:36:38+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या आग्रा रोडवरील भागवत बारच्या समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन जणांवर धारदार शस्राने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ३) घडली. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा
पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या आग्रा रोडवरील भागवत बारच्या समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन जणांवर धारदार शस्राने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ३) घडली. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव शहरातील भागवत बिअरबारच्या परिसरात फिर्यादी महेंद्र आनंदा साळवे, रा. पिंपळगाव बसवंत यांना संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यासह संशयितांनी अशोक पठाडे व रोहिदास गांगुर्डे यांनाही तलवार व फायटरच्या साहाय्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली.
याबाबत फिर्यादी महेंद्र साळवे यांच्या सांगण्यानुसार संशयित मोहित गांगुर्डे, संदीप रंगनाथ गांगुर्डे, रोशन अंबादास गांगुर्डे, निकीत विश्वनाथ गांगुर्डे, लक्ष्मण पुंजाराम गांगुर्डे, आकाश अंबादास गांगुर्डे, राहुल लक्ष्मण गांगुर्डे या सात जणांवर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक संजय महाजन व सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. एम. गांगुर्डे अधिक तपास करीत आहे.