साडेसातशे कोटींची उलाढाल होणार ठप्प

By Admin | Updated: March 26, 2015 00:06 IST2015-03-26T00:06:07+5:302015-03-26T00:06:15+5:30

सलग तीन सुट्या : धनादेश वटणार पाच दिवसांनंतर

Seven billion rupees turnover will be jammed | साडेसातशे कोटींची उलाढाल होणार ठप्प

साडेसातशे कोटींची उलाढाल होणार ठप्प

नाशिक : आर्थिक वर्षअखेरीसची धामधूम आता जवळपास सर्वच क्षेत्रांत दिसत असून, कागदोपत्री व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही आर्थिक व्यवहार मात्र अडकून पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बाजारातील कोट्यवधींची आर्थिक उलाढाल किमान पाच दिवस तरी अडकून पडणार आहे.
मार्चअखेरीस जवळपास सर्वच स्तरातील व्यावसायिक आणि उद्योजकांचे ताळेबंद पूर्ण होत असतात. त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी धनादेश महत्त्वाचे माध्यम असते. यंदा वर्ष पूर्ण होताना २८ तारखेला शनिवारी रामनवमीची सुटी आणि रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने दोन दिवस बॅँका बंद राहणार आहेत. त्याशिवाय १ तारखेपासून पुन्हा बॅँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. चारला शनिवार असल्याने त्या दिवशी पुन्हा अर्धाच दिवस बॅँक सुरू असेल आणि रविवारची पुन्हा सुटी असे सलग पाच दिवस बॅँकांचे कामकाज बंद राहणार असल्याने प्रत्येक दिवशी किमान १५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होणार असे गृहीत धरल्यास सुमारे ७५० कोटी रुपयांचे व्यवहार या पाच दिवसांत ठप्प होणार आहेत.

Web Title: Seven billion rupees turnover will be jammed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.