पेठ तालुक्यात संविधान सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:50 IST2018-12-04T17:43:02+5:302018-12-04T17:50:24+5:30
पेठ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे वतीने पेठ तालुक्यात संविधान सप्ताह साजरा करण्यात आला. तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व शासकिय आश्रमशाळा, पंचायत समतिी, तहसील कार्यालय, नगरपंचायत, पोलीस ठाणे आदीसह शासकिय कार्यालयांना संविधान प्रती व वाचिनय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

झरी (ता.पेठ) येथे संविधान पित्रकेचे वाटप करतांना धनराज महाले, भास्कर गावीत, पुष्पा गवळी, तुळशिराम वाघमारे, शाम गावीत आदी.
पेठ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे वतीने पेठ तालुक्यात संविधान सप्ताह साजरा करण्यात आला. तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व शासकिय आश्रमशाळा, पंचायत समतिी, तहसील कार्यालय, नगरपंचायत, पोलीस ठाणे आदीसह शासकिय कार्यालयांना संविधान प्रती व वाचिनय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
झरी येथे संविधान सप्ताहाची सांगता करण्यात आली. संविधान वाचन संविधानातील मूलतत्त्वे या विषयावर उपक्र म घेण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार धनराज महाले, जि.प. सदस्य भास्कर गावित, संचालक शाम गावित, सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशीराम वाघमारे, रामदास वाघेरे, पुंडलिक महाले, हिरामण जाधव, सरपंच रमेश दरोडे, बार्टी समतादूत अरु ण सुबर, उत्तम कराटे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.