शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सत्र सुरूच : शहरातून ९० हजारांच्या दुचाकी चोरट्यांनी केल्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 17:20 IST

दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी एकाच दिवशी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. दुचाकीचोरीच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देशहरात दररोज एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी दुचाकी चोरीचे गुन्हे शहरात पुन्हा वाढल्याने नाराजी

नाशिक : शहर व परिसरात चोरट्यांकडून नागरीकांची वाहने लंपास करण्याचे सत्र सुरूच असून दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी एकाच दिवशी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. दुचाकीचोरीच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे.पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याची हद्द अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण सरकारी कार्यालयांपासून न्यायालय, रूग्णालय, महाविद्यालयांसह खासगी कार्यालयांसह बाजारपेठेचा वर्दळीचा परिसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांसोबत दुचाकीचोरी, मोबाईल, सोनसाखळीचोरीच्या घटना वाढल्या आहेत. ठक्कर बाजार येथील नव्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातून चोरट्यांनी श्रीहरी रमेश निकम (३८,रा.हिरावाडी) यांच्या मालकीची ३० हजारांची दुचाकी (एम.एच १५अ‍ेझेड ७७४४) हातोहात लंपास केली. दुसऱ्या घटनेत याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जिल्हा रुग्णालयाच्या वाहनतळात उभी केलेली अमोल खंडू भांडारकर (रा. शिवाजीनगर) यांच्या मालकीची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी (एम.एच १९ बीके २१३६) चोरट्यांनी पळवून नेली.तीसऱ्या घटनेत आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखलगाव येथून चोरट्यांनी ३० हजार रुपये किंमतीची चंद्रभान मुरलीधर जाधव यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. या तीन घटनांमध्ये सुमारे एकूण ९० हजार रुपयांच्या दुचाकी चोरट्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातून चोरून नेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. दुचाकी चोरी करणाणी टोळी शाहरात पुन्हा सक्रीय झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. गुन्हे शाखेच्या वतीने दुचाकी चोरट्यांचा माग काढून मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे. शहरात दररोज एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी असते. दुचाकी चोरीचे गुन्हे शहरात पुन्हा वाढल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या तीनही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयbikeबाईकtheftचोरी