निमोण येथील महिला मारहाणीत गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:33 IST2020-07-13T00:32:40+5:302020-07-13T00:33:49+5:30

निमोण येथे संशयावरुन पत्नी झोपेत असतांना फावड्याने कपाळावर वार करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याची फिर्याद जखमी महिलेच्या भावाने चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Seriously injured in the beating of a woman in Nimon | निमोण येथील महिला मारहाणीत गंभीर जखमी

निमोण येथील महिला मारहाणीत गंभीर जखमी

चांदवड : तालुक्यातील निमोण येथे संशयावरुन पत्नी झोपेत असतांना फावड्याने कपाळावर वार करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याची फिर्याद जखमी महिलेच्या भावाने चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सोनू मारुती पवार रा. निमोण याने फिर्यादीत म्हटले आहे की, बहिणीचे पती काळू प्रताप सोनवणे रा. निमोण मूळ गाव मुंजवाड ता. सटाणा हे बऱ्याच वर्षापासून निमोण येथे छाया काळू सोनवणे (२७) हिचे बरोबर राहतात. त्यांना पल्लवी व रिना अशा दोन मुली असून शनिवार दि. ११ जुलै रोजी रात्री उशीरा त्या पळत आल्या व सांगितले की, आईला पप्पांनी फावड्याने कपाळावर वार करुन गंभीर जखमी केले. ही माहिती मिळताच मी व माझा भाऊ अर्जून पवार तातडीने त्यांच्या घरी गेलो असता बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला तातडीने मनमाड येथे प्रथमोपचार करुन नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Seriously injured in the beating of a woman in Nimon