ज्येष्ठ माकप नेत्या अनुराधा मालुसरे यांचे ९०व्या वर्षी निधन

By संजय पाठक | Updated: September 7, 2023 15:14 IST2023-09-07T15:12:40+5:302023-09-07T15:14:37+5:30

सामाजिक हक्कांसाठी लढणाऱ्या मालुसरे कुटुंबाच्या सर्व कार्यात होत्या सक्रिय

Senior CPM leader Anuradha Malusare passed away at the age of 90 | ज्येष्ठ माकप नेत्या अनुराधा मालुसरे यांचे ९०व्या वर्षी निधन

ज्येष्ठ माकप नेत्या अनुराधा मालुसरे यांचे ९०व्या वर्षी निधन

संजय पाठक, नाशिक: ज्येष्ठ सामाजिक आणि माकप कार्यकर्त्या अनुराधाताई नरेंद्र मालुसरे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहित पुत्र आणि कन्या असा परिवार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते दिवंगत नरेंद्र तथा नाना मालुसरे यांच्या त्या पत्नी होत्या. तसेच आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी आणि क्रीडा संघटक संजय मालुसरे यांच्या त्या मातोश्री होत्या.

नाशिकमधील सामाजिक, राजकीय चळवळीत कार्यरत राहून आणि कामगार, महिला, आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या मालुसरे कुटुंबाच्या सर्व कार्यात अनुराधाताई यांचा सक्रिय सहभाग होता. नाना मालुसरे यांच्या निधनानंतर कॅा. नरेंद्र मालुसरे दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले.

Web Title: Senior CPM leader Anuradha Malusare passed away at the age of 90

टॅग्स :Nashikनाशिक