कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव देविगरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:06 IST2020-08-17T20:58:05+5:302020-08-18T01:06:33+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस किसनराव यशवंत देविगरे (७०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.

Senior Congress leader Kisanrao Devigare passes away | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव देविगरे यांचे निधन

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव देविगरे यांचे निधन

ठळक मुद्देआडगाव येथील रु ग्णालयात उपचार सुरु असतांना निधन

घोटी : इगतपुरी तालुक्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस किसनराव यशवंत देविगरे (७०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
देवगिरे यांनी गेली पंचेचाळीस वर्षे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. इगतपुरी (घोटी) खरेदी विक्र ी संघाचे निवृत्त व्यवस्थापक म्हणून त्यांनी या संस्थेच्या विस्तारासह तालुक्याच्या विविध प्रश्नांसाठी काम केले. ज्येष्ट नेते गोपाळराव गुळवे यांचे ते सहकारी होते. पिंपळगाव घाडगा येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूका अनेक वर्षे त्यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध होत असत. बिनविरोध निवडून आलेले ते पहिले सरपंच होते. शेणीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे ते चेअरमन होते. गावातील आदिवासी तसेच युवकांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी मजूर सहकारी सोसायटी स्थापन केली होती. त्या माध्यमातून त्यांनी परिसरात अनेक विकासकामे केली. गेल्या आठवड्यात त्यांना प्रकृती बरी नसल्याने नाशिकच्या रु ग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील रु ग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरु असतांनाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली व मुलगा डॉक्टर गोपाल, पत्नी असा परिवार आहे. (फोटो १७ किसन देवगिरे)

Web Title: Senior Congress leader Kisanrao Devigare passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.