The senior citizen was robbed by the police | पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला लुटले

पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला लुटले

जेलरोड पारिजात नगर, नंदनदीप सोसायटीत राहणारे वयोवृध्द नंदू रघुनाथ घोडे (वय ६५) हे ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता स्कुटीवरून कॅनलरोडने घरी जात होते. रस्त्यात दोघा इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांना थांबविले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाहनांची तपासणी सुरू असल्याचे सांगत घोडे यांना त्यांच्या गळ्यातील चेन व हातातील दोन अंगठ्या काढून डिक्कीत ठेवण्यास सांगितले. घोडे यांनी तीन तोळ्याची चेन व दहा ग्रॅमच्या दोन अंगठ्या रुमालात ठेवल्या. हे दागिने डिक्कीत ठेवत असताना दोघा तोतयांनी दागिने असलेला रुमाल डिक्कीत ठेवून दोघेजण काळ्या दुचाकीवरून निघून गेले. घोडे यांना संशय आल्याने त्यांनी डिक्कीतील रुमाल तपासला असता पन्नास हजारांचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The senior citizen was robbed by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.