शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

स्वार्थी दुनियादारी : विव्हळणाऱ्या ‘गज’लक्ष्मीचा मूक आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:38 PM

म्हसरूळ परिसरातून जाणा-या मार्गालगत एका झोपडीच्या शेजारी ‘लक्ष्मी’ नावाची हत्तीण हमखास नजरेस पडते. ४५ वर्षीय लक्ष्मी याठिकाणी बेवारस स्थितीत बांधलेली असते. या हत्तिणीचा मालक असल्याचे सांगणारी व्यक्ती ही परराज्यातील असून, ती एक भिक्षेकरी आहे.

ठळक मुद्देहत्तिणीचा मालक असल्याचे सांगणारी व्यक्ती ही परराज्यातीललक्ष्मीच्या एका डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे एका झोपडीच्या शेजारी ‘लक्ष्मी’ नावाची हत्तीण हमखास नजरेस पडते

सतीश डोंगरे ।नाशिक : मुक्या जिवांवर उदार होऊन आपला स्वार्थ पूर्ण करणे ही पूर्वापार मानवी प्रवृत्ती राहिली आहे. सध्या असेच काहीसे चित्र नाशिकनगरीत बघावयास मिळत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी महाकाय हत्तिणीला जखमी अवस्थेत भर उन्हाळ्यात डांबरी रस्त्याची तप्त वाट तुडवत दारोदार फिरविले जात आहे. या हत्तिणीच्या शरीरावर जागोजागी जखमा असून, तिच्या वेदनांकडे तथाकथित मालकासह वनविभागही डोळेझाक करीत असल्याने तिला वेदनादायी आयुष्य जगावे लागत आहे.सामान्यत: आवाक्याबाहेरील वस्तू सांभाळताना हत्ती पोसणे असा शब्दप्रयोग केला जातो. मात्र प्रस्तुत प्रकरणात हत्तीच आपल्या कथीत मालकाला पोसत आहे. एवढे करूनही त्या गजलक्ष्मीची शुश्रूषा होत नसेल तर आणि त्यातून या हत्तिणीच्या जीविताला धोका पोहोचल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न प्राणी मित्र करीत आहेत.

म्हसरूळ परिसरातून जाणा-या मार्गालगत एका झोपडीच्या शेजारी ‘लक्ष्मी’ नावाची हत्तीण हमखास नजरेस पडते. ४५ वर्षीय लक्ष्मी याठिकाणी बेवारस स्थितीत बांधलेली असते. या हत्तिणीचा मालक असल्याचे सांगणारी व्यक्ती ही परराज्यातील असून, ती एक भिक्षेकरी आहे. आपल्याला ही हत्तीण दानपात्रात मिळाल्याचे तो सांगतो. मात्र, या हत्तिणीची देखभाल किती केली जात असेल याविषयी शंकाच आहे. सध्या या हत्तिणीच्या म्हणजेच लक्ष्मीच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्या असून, त्यावर फुंकर घालण्याचे कष्टही त्याच्याकडून घेतले जात नाही. लक्ष्मीच्या एका डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे. तिच्या मानेवरती एक भलीमोठी जखम असून, त्याचा संसर्ग तिच्या शरीराच्या इतर भागात होताना दिसत आहे. तसेच कानावर फोड आले असून, शरीराच्या मागच्या भागाला एक मोठी जखम झाली आहे. त्यामुळे तिला बसताना प्रचंड वेदना होत असाव्यात.

तसेच कानावर फोड आले असून, शरीराच्या मागच्या भागाला एक मोठी जखम झाली आहे. त्यामुळे तिला बसताना प्रचंड वेदना होतात.अशाही स्थितीत संबंधित व्यक्ती तिला शहरातील विविध भागांमध्ये पैसे कमावण्यासाठी फिरवतो, तसेच इतर जिल्ह्यांमध्येही सार्वजनिक तथा खासगी कार्यक्रमासाठी तिचे ने-आण करून त्यातून बक्कळ पैसे कमावतो. मात्र तिच्या जखमांवर उपचार करण्यासाठी तो आवश्यक ते प्रयत्न करताना दिसत नाही. उलट लक्ष्मीच्या शरीरावरील जखमा ठळकपणे दिसू नयेत म्हणून जखमांच्या अवतीभोवती त्याने रंगांच्या साह्याने फुलांची चित्रे काढली आहेत.दरम्यान, अ‍ॅनिमल वेल्फेअर अ‍ॅण्ड अ‍ॅँटी हॅरेशमेंट सोसायटी अर्थात ‘आवास’ या संस्थेने लक्ष्मीवर तत्काळ उपचार केले जावेत म्हणून वनविभागाकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु वनविभागाच्या चालढकल कारभारामुळे ‘लक्ष्मी’च्या वेदना कमी होणार काय, याविषयी अजूनही साशंकता आहे.

वनविभागाला न्यायालयाची भीतीलक्ष्मीची तातडीने मुक्तता करून उपचारासाठी योग्य ठिकाणी पाठविले जावे, अशी मागणी आवासकडून केली जात असतानाही वनविभाग कुचराईची भूमिका घेताना दिसत आहे. वनविभागाच्या काही अधिकाºयांनी तर कारवाई करण्याबाबत हात वर करताना, संबंधित व्यक्ती न्यायालयात गेल्यास आमची नोकरी धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागNashikनाशिक