स्व. शांतीलालजी सोनी पतसंस्थेला सहकार प्रेरणा गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 17:17 IST2020-03-15T17:15:17+5:302020-03-15T17:17:11+5:30
निफाड : येथील स्व . शांतीलालजी सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्थेला उत्तम कामगिरीबद्दल नाशिक जिल्ह्यातील प्रथम क्र मांकाचा सहकार प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

स्व. शांतीलालजी सोनी पतसंस्थेला सहकार प्रेरणा गौरव पुरस्कार
जिल्हा सहकारी पतसंस्थांचे सहकार फेडरेशन व सहकार भारती सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्यादित कराड जिल्हा सातारा, यांच्या वतीने तिरु पती येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी या पतसंस्थेला सन्मानित करण्यात आले. या पतसंस्थेच्या १५० कोटी रूपयांच्या ठेवी असून , ही पतसंस्था एटीएम, आरटीजी , एनएफटी , वीज बिल भरणा केंद्र, २४ तास रु ग्णवाहिका सेवा आदी सुविधा पुरवित आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात पतसंस्थेने उत्कृष्ट कामकाज केल्याने सदर सन्मानासाठी निवड झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. अजय ब्रम्हेच्या, भास्कर कोठावदे, रत्नाकर कदम, नानासाहेब सोनवणे यांच्या हस्ते या पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक सोनी, उपाध्यक्ष संपत कराड व संचालक मंडळाचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक अंबादास गोळे ,भास्कर ढेपले, मधुकर राऊत, हेमंत खडताळे ,सुरेश कुंदे , व्यवस्थापक रामनाथ सानप आदी उपस्थित होते