मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:15 IST2020-02-14T22:53:53+5:302020-02-15T00:15:03+5:30

सटाणा येथे बागलाण तालुका माध्यमिक व उच्य माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय देसले यांचा कार्यकाळ संपल्याने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

Selection of the Head of the Federation | मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीची निवड

सटाणा येथे निवडण्यात आलेल्या बागलाण तालुका माध्य व उच्य माध्य मुख्याध्यापक संघाची नूतन कार्यकारणीतील सदस्य़

नामपूर : सटाणा येथे बागलाण तालुका माध्यमिक व उच्य माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय देसले यांचा कार्यकाळ संपल्याने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निरीक्षक म्हणून जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक सुरेश शेलार व कोषाध्यक्ष एन. आर. देवरे यांच्या उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी सुलभा मराठे यांची निवड करण्यात आली, तर कार्यवाहपदी कैलास वाघ, रातीर यांची निवाड झाली. उपाध्यक्ष पदी स्नेहलता नेरकर, महेंद्र कुवर, पी. बी. खैरनार, पाटील यांची निवड झाली. एस. डी. सोमवंशी, ए. डी. पगार, संजय पवार, प्रकाश वाघ, एम. आर. देसाई, कापडणीस, संजय धिवरे, अनिल जाधव, विधायक सटाणा के. जी. बच्छाव, शेमळी, एम.आय. न्हावकर, ए. के. मोरे, कैलास नेरकर, विनायक भामरे, डी. डी. ह्याळीज, के. बी. अहिरे, बी. एच. कापडणीस, करुणा देवरे, हेमलता जाधव तसेच जिल्हा प्रतिनिधी संजय देसले यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

Web Title: Selection of the Head of the Federation