रोजगार संधी उपक्रमात ३४५ जणांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:15 IST2021-09-03T04:15:00+5:302021-09-03T04:15:00+5:30
सिन्नर : येथील कामगार शक्ती फाऊंडेशनच्या पुढाकाराने येथील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे रोजगार संधी या उपक्रमात माळेगाव, मुसळगाव, गोंदे व ...

रोजगार संधी उपक्रमात ३४५ जणांची निवड
सिन्नर : येथील कामगार शक्ती फाऊंडेशनच्या पुढाकाराने येथील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे रोजगार संधी या उपक्रमात माळेगाव, मुसळगाव, गोंदे व पास्ते येथील ५५ नामांकित कंपन्यानी सहभाग नोंदविला. या उपक्रमाच्या माध्यमातून सिन्नर शहर इतर तालुक्यातील जवळपास ४६० तरुण-तरुणींनी सहभाग नोंदविला व ३४५ जणांची नोकरीसाठी निवड झाली.
माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवा नेते उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, ॲडव्हान्स एन्झाइम लि. कंपनीचे चेअरमन किशोर राठी, जिंदाल सॉ लि. कंपनीचे एचआर हेड एस. बी. सिन्हा, रिंग प्लस ॲक्वाचे प्लांट हेड कमलाकर टाक, सिप्राचे जनरल मॅनेजर मल्लिकार्जुन उमदी, कामगार शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार, नगरसेवक पंकज मोरे, संजय वामने, संतोष भडांगे आदी उपस्थित होते. किरण भावसार यांनी सूत्रसंचालन केले. सतीश नेहे यांनी आभार मानले.