कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली १२ जनावरे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 01:42 IST2022-05-30T01:41:59+5:302022-05-30T01:42:21+5:30

दिंडोरी तालुक्यातील उमराळे खुर्द येथे पोलिसांच्या धडक कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली १२ जनावरे जप्त करण्यात आली आहेत.

Seized 12 animals kept for slaughter | कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली १२ जनावरे जप्त

कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली १२ जनावरे जप्त

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे खुर्द येथे पोलिसांच्या धडक कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली १२ जनावरे जप्त करण्यात आली आहेत. याबाबतचे वृत्त असे की तालुक्यातील उमराळे खुर्द येथे संशयित आरोपी सुभाष शार्दुल यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीची जनावरे डांबून ठेवण्यात आली होती तसेच तीन जनावरे महिंद्रा पिकअप या वाहनात अवैधरीत्या वाहतूक करणार असल्याची माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या घटनास्थळी छापा टाकत १२ जनावरे व जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले पिकअप वाहन जप्त केले.

याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करीत जनावरांची मुक्तता करण्यात आली. सदर कार्यवाही दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस हवालदार तुळशीराम जाधव, पोलीस नाईक प्रसाद सहाने, सुदाम धुमाळ, संदीप कडाळे, पोलीस शिपाई मधुकर बेंडकुळी, अविनाश आहेर, पोलीस चालक निवृत्ती फड यांच्या पथकाने कारवाई केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दिंडोरी चेतन लोखंडे हे करीत आहेत.

 

 

Web Title: Seized 12 animals kept for slaughter