इमारतीवरून कोसळल्याने सुरक्षारक्षक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:53 IST2019-12-20T00:52:29+5:302019-12-20T00:53:17+5:30
उपनगर येथे असलेल्या इच्छामणी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका ४२ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अकस्मात नोंद केली आहे.

इमारतीवरून कोसळल्याने सुरक्षारक्षक ठार
नाशिक : उपनगर येथे असलेल्या इच्छामणी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका ४२ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अकस्मात नोंद केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळू शेकू टोकळ (४२, रा.उपनगर) हे शाळेत सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला होते. बुधवारी (दि.१८) रात्री टोकळ हे
मद्यप्राशन करून शाळेच्या गच्चीवर १० वाजेच्या सुमारास झोपण्यासाठी गेले होते.
गुरुवारी (दि.१९) पहाटे साडेसहा-सात वाजेच्या सुमारास तो झोपेतच तिसºया मजल्यावरून खाली कोसळला. त्यास उपचारासाठी जिल्हा सरकारी रु ग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असून या घटनेची अकस्मात नोंद करण्यात आली आहे.