सिन्नर : तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन सुरक्षारक्षक ठार झाल्याची घटना घडली.आसिफ खान रसूल खान (४५ रा. शिवाजीनगर, सिन्नर) असे ठार झालेल्या रक्षकाचे नाव आहे. माळेगाव वसाहतीतील नोबल हायजिन या कारखान्याच्या परिसरात हा अपघात झाला. आसिफ खान हे दुचाकीवरून कामावर जात होते. त्याच सुमारास वसाहतीतून सिन्नरच्या दिशेने चंद्रकांत रमेश कापसे व अभिषेक कडुबा खिल्लारी हे दोघे दुचाकीवरून येत होते. खान व कापसे याच्या दुचाकींमध्ये धडक होऊन अपघात झाला. त्यात खान जागीच ठार झाले. कापसे व खिल्लारी जखमी झाले असून, त्यांना सिन्नरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दुचाकी अपघातात सुरक्षारक्षक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:08 IST