शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुरक्षारक्षकांनी महिलांना मुलांसह उद्यानात अडकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:31 IST

गंगापूररोडवरील पंपिंगस्टेशन परिसरात महापालिकेने उभारलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व संग्रहालय परिसरात मंगळवारी (दि.२८) सायंकाळी पावणे आठ वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरक्षारक्षकांनी तीन महिलांना पाच ते सहा मुलांसह आतमध्ये अडकवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : गंगापूररोडवरील पंपिंगस्टेशन परिसरात महापालिकेने उभारलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व संग्रहालय परिसरात मंगळवारी (दि.२८) सायंकाळी पावणे आठ वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरक्षारक्षकांनी तीन महिलांना पाच ते सहा मुलांसह आतमध्ये अडकवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी किरण बाजीराव कापसे यांनी सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील उद्यानाशेजारी असलेल्या सोमनाथ पार्कमध्ये कापसे हे कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांचे कुटुंबीय परिसरातील महिला व मुले महापालिकेने ठरवून दिलेले शुल्काची रक्कम सुरक्षारक्षकांकडे रीतसर जमा करून तिक ीट घेऊन उद्यानामध्ये गेले होते. यामध्ये कापसे यांच्या पत्नीसह मुलांचाही समावेश होता. दरम्यान, सव्वाआठ वाजेच्या सुमारास कापसे यांच्या मुलीने जोरात आरडाओरड केल्याने ते घराबाहेर आले व त्यांनी उद्यानाकडे धाव घेतली असता मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले होते. त्यांनी येथील सुरक्षारक्षकांना विनंती करत आतमध्ये मुले, महिला अडकल्या असून, प्रवेशद्वार उघडण्यास सांगितले, मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना न जुमानता उद्धट भाषेत ‘प्रवेशद्वाराचे कुलूप उघडणार नाही, तुला काय करायचे ते कर’ असे सुनावल्याचे कापसे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.दरम्यान, कापसे यांनी तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधून घडला प्रकार कथन करत मदत मागितली. यावेळी कुलूप उघडत नसल्यामुळे उद्यानात अडकून पडलेली लहान मुले जोरजोराने रडू लागली होती. तरीदेखील सुरक्षारक्षकांनी उद्यानाचे कुलूप उघडले नाही आणि उद्यानातील विद्युतव्यवस्थाही बंद करण्यात आली होती.या प्रकारामुळे महिला, मुले खूप घाबरून गेले. साडेनऊ वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी सुरक्षारक्षकांना प्रवेशद्वाराचे कुलूप उघडण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कुलूप उघडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कापसे यांच्या तक्रारीवरून दोन्ही सुरक्षारक्षकांविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिस