महावितरणच्या वतीने सुरक्षा जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:18 IST2019-01-13T00:18:37+5:302019-01-13T00:18:55+5:30
महावितरणच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त विजेचा सुरक्षित वापर व वीज अपघात टाळण्यासाठी आवश्यक दक्षता याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

महावितरणच्या वतीने सुरक्षा जनजागृती
नाशिकरोड : महावितरणच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त विजेचा सुरक्षित वापर व वीज अपघात टाळण्यासाठी आवश्यक दक्षता याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सप्ताहानिमित्त विजेचा सुरक्षित वापर करण्याबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरणने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये सुरक्षेची प्रतिज्ञा घेण्यात आली. तर परिमंडळ कार्यालयात जनजागृतीपर भित्तिपत्रके, फलक, पत्रके लावण्यात आले. यावेळी
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जनजागृती फेरी, शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.