नाशिक : रमजान ईदप्रमाणे बुधवारी (दि.२१) साजऱ्या होणाऱ्या ह्यईद-उल-अज्हाह्ण अर्थात बकरी ईदवरदेखी कोरोनाचे सावट असल्याने ऐतिहासिक ईदगाह मैदानावर होणारा सामुहिक विशेष नमाजपठणाचा सोहळा शासनाच्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्याचे शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले आहे. यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी ईदगाह मैदान सुनेसुने राहणार आहे. दोन महिन्यांपुर्वी साजरी झालेल्या रमजान ईदचेही सामुहिक नमाजपठण ईदगाह मैदानावर करण्यात आले नव्हते.
सलग दुसऱ्या वर्षी ईदगाह मैदान राहणार सुनेसुने; बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 14:47 IST
पवित्र हज यात्राही सौदी अरेबिया सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली. हज यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. बकरी ईद आणि हज यात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाजबांधवांचा हिरमोड झाला आहे.
सलग दुसऱ्या वर्षी ईदगाह मैदान राहणार सुनेसुने; बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन
ठळक मुद्देदाऊदी बोहरा बांधवांकडुन ईद साजरीप्रवचन यु-ट्युबवरुन लाइव्ह करण्यात आले. सोशलमिडियाद्वारे संदेश पाठवून शुभेच्छा घरांमध्ये नमाज अदा करण्यास प्राधान्य दिले जाणार