कळवण तालुक्याला द्वितीय क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:07 AM2018-10-27T01:07:13+5:302018-10-27T01:07:44+5:30

पंचायतराज संस्थामध्ये प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.

Second number in Kalwan taluka | कळवण तालुक्याला द्वितीय क्रमांक

कळवण तालुक्याला द्वितीय क्रमांक

googlenewsNext
ठळक मुद्देपंचायतराज : उत्कृष्ट व्यवस्थापन आणि विकासाचा गौरव

नाशिक : पंचायतराज संस्थामध्ये प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे मानव संपदामधील उत्कृष्ट काम केल्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी तसेच निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
पंचायतराज संस्थांमध्ये प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाºया जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत पुरस्कार देण्यात येतो. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्र मांकाचा पुरस्कार देण्यात आला.
या सोहळ्यास ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता उपस्थित होते. राज्यातील पंचायत राज संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी २००५-२००६ पासून यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. हे पुरस्कार राज्य व विभागीय स्तरावर जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीला दिले जातात. सोबतच गुणवंत कर्मचाºयांनासुद्धा पुरस्कृत करण्यात येते.
कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्र मांकाचा पुरस्कार करण्यात आला. कळवण पंचायत समितीचे सभापती लालजी जाधव, गटविकास अधिकारी डोंगर बहिरम, उपसभापती विजय शिरसाठ, सहायक गटविकास अधिकारी
एस. एस. जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला.
मानव संपदेच्या कामामुळे जिल्ह्याचा सन्मान
आस्थापना विषयक सर्व बाबी भरण्यासाठी मानव संपदा प्रणाली वापरण्यात येत आहे. शासनाने प्रायोगिक तत्त्वावर यासाठी नागपूर जिल्ह्याची निवड केली होती; मात्र तेथे सदरचे काम पूर्ण झाले नाही. डॉ. गिते यांनी शासनाकडे पाठपुरावा करून नाशिक जिल्हा यामध्ये घ्यावा यासाठी पुढाकार घेतला. शासनाने मे महिन्यात मंजुरी दिल्यानंतर जुलै महिन्यातच जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे १७ हजारांच्या वर सेवापुस्तक आॅनलाइन करण्यात आले. यामध्ये रजा, विविध प्रकारचे लाभ आदी आस्थापनाविषयक बाबींची माहिती भरण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. मानव संपदात नाशिक जिल्हा राज्यात प्रथम क्र मांकावर आहे.

Web Title: Second number in Kalwan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.