सिन्नरमध्ये धाडसी चोऱ्या; २० लाखांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: July 19, 2014 01:09 IST2014-07-18T23:28:03+5:302014-07-19T01:09:22+5:30

सिन्नरमध्ये धाडसी चोऱ्या; २० लाखांचा ऐवज लंपास

Searcher's courageous thieves; Lamp of Rs 20 lakhs | सिन्नरमध्ये धाडसी चोऱ्या; २० लाखांचा ऐवज लंपास

सिन्नरमध्ये धाडसी चोऱ्या; २० लाखांचा ऐवज लंपास

सिन्नर : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या दोन ठिकाणी व मुसळगाव येथील एका दुकानात धाडसी चोऱ्यांमधून सुमारे वीस लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील नाशिक - पुणे महामार्गालगत असलेल्या भिकुसा बागेजवळील बडोदा बँकेच्या शाखेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने तोडून त्याताील १४ लाख, ८८ हजार सातशे रुपये चोरट्यांनी लांबविले. यावेळी चेहरे दिसू नयेत म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड, कागद लावण्यात आले होते. एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षकांची नेमणूक नसल्याने चोऱ्यांनी धाडस केले असावे. त्यानंतर येथील नेहरु चौकातील पीयूष लोया यांच्या स्टार मोबाइल या दुकानाच्या खिडकीचे गज कटरच्या साहाय्याने तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील दीड लाख रुपये किमतीचे दीडशे मोबाइल संच, ४५ हजार रुपयांचे तीन लॅपटॉप, जुने दुरुस्तीसाठी आलेले २० हजाराचे मोबाइल संच व ३५ हजार रुपये रोख मिळून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबविला.
तालुक्यातील मुसळगाव येथील रमेश माळी यांच्या ओमसाई इलेक्ट्रॉनिक या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यातील एक लॅपटॉप व ५३ मोबाइल संच मिळून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबर बी-१०६ मधील आरती एन्टरप्रायजेस या कारखान्यातून मशीनच्या सुमारे ३६ हजार रुपये किमतीचे तीन विद्युत पंप व १२ हजार रुपये किमतीचे तीन मेणबत्तीचे खोके मिळून सुमारे ४८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविले. या एकाच रात्री शहरात दोन तर तालुक्यात दोन ठिकाणी चोऱ्यांमुळे खळबळ उडाली आहे.
या घटनांची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे निरीक्षक रा. जा. देसाई, सिन्नरचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तीन घटनांचे पंचानामे करण्यात आले आहे. तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. नाशिकहून श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. (वार्ताहर)

Web Title: Searcher's courageous thieves; Lamp of Rs 20 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.