शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

आघाडीकडून सेनेविरोधात सक्षम उमेदवाराचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 1:07 AM

सिन्नर : लोकसभा निवडणुकीतच विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम झाल्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. गेल्या विधानसभेला भाजप, शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. यावेळी आघाडी व युती झाल्यास संभाव्य उमेदवार कोण असतील यावर चर्चा सुरू आहे. युती झाल्यास विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे त्यांच्याविरोधात आघाडीकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. विद्यमान आमदार वाजेंविरोधात ऐनवेळी आघाडीकडून माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना उमेदवारीसाठी गळ घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा समाजानंतर सर्वाधिक मते असणाऱ्या वंजारी समाजाचीही भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.

ठळक मुद्देकोकाटे यांच्या भूमिकेकडे नजरा : वंजारी समाजाची भूमिका ठरणार महत्त्वाची

शैलेश कर्पे।लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : लोकसभा निवडणुकीतच विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम झाल्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. गेल्या विधानसभेला भाजप, शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. यावेळी आघाडी व युती झाल्यास संभाव्य उमेदवार कोण असतील यावर चर्चा सुरू आहे. युती झाल्यास विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे त्यांच्याविरोधात आघाडीकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. विद्यमान आमदार वाजेंविरोधात ऐनवेळी आघाडीकडून माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना उमेदवारीसाठी गळ घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा समाजानंतर सर्वाधिक मते असणाऱ्या वंजारी समाजाचीही भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.सिन्नर विधानसभा मतदारसंघाने आजपर्यंत पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारणाला महत्त्व दिल्याचे अनेक निवडणुकीतून दिसून आले आहे. त्यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार आहे, त्यापेक्षा तो कोणत्या गटाचा यावरच निवडणुकीचे निकाल लागल्याचे दिसून आले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. तरीही खरी लढत शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे व भाजपचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यातच झाली होती. त्यात शिवसेनेच्या वाजे यांनी बाजी मारली होती. कॉँग्रेस, राष्टÑवादी या उमेदवारांसह सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते, तर मनसेला उमेदवारही मिळाला नव्हता.गेल्या पाच वर्षांत शिवसेनेत पक्षांतराच्या घडामोडी घडल्या नसल्या तरी कोकाटे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली होती. त्यामुळे कोकाटे सध्यातरी कोणत्याच पक्षात नाही. शिवसेनेकडून विद्यमान आमदार वाजे यांना उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांचे पती उदय सांगळे यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत येणे सहाजिक आहे. सेनेचे उमेदवार वाजे यांना लढत देण्यासाठी कॉँग्रेस-राष्टÑवादीकडे सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जाणे स्वाभाविक आहे. कॉँग्रेसकडून तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्यासह ऐनवेळी माजी आमदार माणिकराव कोकाटे उमेदवार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कोकाटे यांनी २००९ च्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाकडून निवडणूक जिंकली होती. राष्टÑवादी कॉँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, माजी तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे यांची नावे चर्चेत आहे. भाजप व मनसेच्या गोटात सध्यातरी शांतता आहे. बहुजन वंचित आघाडीनेही सिन्नर मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. शिवसेना-भाजप युती न झाल्यास भाजपकडून ऐनवेळी महिला व बाल कल्याण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय उदय सांगळे यांनाही उमेदवारीसाठी गळाला लावण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. किंवा पुन्हा माजी आमदार माणिकराव कोकाटे अथवा त्यांची कन्या व भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनाही रिंगणात उतरवले जाऊ शकते. आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे आघाडीच्या गोटात जातात की युती न होण्याची वाट पाहून भाजपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात याची उत्सुकता असणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोकाटेंना सिन्नर मतदारसंघात मिळालेली ९१ हजार मते अपक्ष उमेदवारीसाठीही खुणावू शकतात. आघाडी व युतीच्या भवितव्यावरच सिन्नर मतदारसंघातील उमेदवार ठरणार आहे. तूर्त या मतदारसंघात आघाडी मात्र सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसून येते. वाजे यांची दावेदारी निश्चितआगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात युती जवळपास शक्य मानली जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारीसाठी दावेदारी निश्चित मानली जात आहे. आघाडीत वंचित आघाडीला सामावून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. वंचित आघाडीचा समावेश झाल्यास काही प्रमाणात समिकरणे बदलू शकतात. ..तर माणिकराव आघाडीचे उमेदवारगेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी भाजपकडून उमेदवारी केली होती. त्यानंतर कोकाटे यांनी लोकसभेला बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली होती. आता विधानसभेला युती आणि आघाडी झाल्यास कोकाटेंना युतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही म्हणूत ते आघाडीकडून उमेदवारी करतील अशी शक्यता आहे. २०१४ चा निकालराजाभाऊ प्रकाश वाजे (विजयी)मते : १,०४,०३१ (शिवसेना)माणिकराव शिवाजीराव कोकाटेमते : ८४,४७७ (भाजप)संपत काळेमते : ३,३१९ (कॉँग्रेस)शुभांगी सुरेश गर्जेमते : २,०५२ (राष्टÑवादी कॉँग्रेस)शशिकांत गायकवाडमते : १,५२० (बसपा)विजय सानपमते : ४७७ (रिपाइं, गवई गट)