नाशिकमध्ये बांधकाम पुर्ण न झालेल्या सभागृहालाही सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 16:43 IST2019-05-10T16:40:22+5:302019-05-10T16:43:04+5:30

नाशिक- महापालिकेने नियमभंग करून चालवलेल्या जाणा-या आपल्याच मिळकतींवरील कारवाई सुरूच ठेवली आहे परंतु त्यापलिकडे जाऊन पंचवटीत ज्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही की, लोकार्पण झाले नाही अशा अर्धवट स्थितीतील मिळकती सील केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १०) घडला. याप्रकरणी नागरीकांबरोबरच सत्तारूढ भाजपाच्या नगरसेवकानेच संताप व्यक्त केला आहे.

The sealed hall has also been sealed in Nashik | नाशिकमध्ये बांधकाम पुर्ण न झालेल्या सभागृहालाही सील

नाशिकमध्ये बांधकाम पुर्ण न झालेल्या सभागृहालाही सील

ठळक मुद्देमनपा कर्मचाऱ्यांची आपल्याच मिळकतीवर कारवाईपंचवटीतील श्रीराम नगरातील प्रकार

नाशिक- महापालिकेने नियमभंग करून चालवलेल्या जाणा-या आपल्याच मिळकतींवरील कारवाई सुरूच ठेवली आहे परंतु त्यापलिकडे जाऊन पंचवटीत ज्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही की, लोकार्पण झाले नाही अशा अर्धवट स्थितीतील मिळकती सील केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १०) घडला. याप्रकरणी नागरीकांबरोबरच सत्तारूढ भाजपाच्या नगरसेवकानेच संताप व्यक्त केला आहे.

पंचवटीत दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी चित्रपटगृहाच्या पाठीमागील बाजूस श्रीराम नगर आहे याठिकाणी एक सभागृह हे माजी आमदार (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या आमदार निधीतून झाले आहे. दुस-या सभागृहाचे सध्या बांधकाम सुरू आहे. अत्यंत नवीन बांधकाम असलेल्या या इमारतीत नुकतीच रंगरंगोटी सुरू असून विद्युतीकरण झालेले नाही. इमारत अपुर्ण असल्याने ती कोणत्याही संस्थेला कराराने चालविण्यास दिलेली नाही. किंबहुना इमारतीचे लोकार्पणच झालेले नाही. मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणताही मागाचा पुढचा विचार न करताच  निर्माणाधिन असलेल्या इमारतीला सील केले आहे.
 
Web Title: The sealed hall has also been sealed in Nashik