शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

चयल खुनातील 22संशयितांच्या 'मोक्का'वर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 6:51 PM

उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षी चयल यास टोळीने ठार मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयितांविरुध्द पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता

ठळक मुद्देअपर पोलीस महासंचालकांनी दिला 'ग्रीन सिग्नल'

नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढत टोळीच्या गैरमार्गाने सुरू असलेल्या वसुलीच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणातून मगील वर्षी १६ नोव्हेंबरला योगेश पन्नालाल चयल (२३,रा. देवळाली गाव) यास एका टोळीने कोयत्याने सपासप वार करुन ठार मारले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या अकरा संशयितांसह त्यांच्या अन्य अकरा साथीदार अशा एकुण २२ गुन्हेगारांच्या टोळीविरुध्द पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मोक्काअंतर्गत कारवाई करत प्रस्ताव अपर पोलीस महासंचालकांकडे पाठविला होता. बुधवारी (दि१२) या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली.उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षी चयल यास टोळीने ठार मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयितांविरुध्द पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या वेळी चयल याचा मित्र सुरज बद्रीनारायण कहाणे यास संशयित हल्लेखोरांनी चाकूचा धाक दाखवून त्याची ॲक्टिवा दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत पलायन केले होते. उपनगर पोलीसांसह गुन्हेशाखा युनिट २ व मध्यवर्ती गुन्हेशाखा यांच्या पथकांनी समांतर तपास करत गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार सागर सुरेश म्हस्के उर्फ सोनु पाईकराव (२२) याच्यासह एकुण ११ संशयितांना अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासात संघटितप्रकारे गुन्हेगारांची टोळी सक्रीय असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. दरम्यान, उर्वरित ११ साथीदारांच्या दुसऱ्या टोळीच्याही मुसक्या बांधल्या. या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुध्द पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मोक्काअन्वये कारवाई करत सहायक आयुक्त समीर शेख यांच्याकडे तपास सोपविला. गुन्ह्यातील २२ संशयितांच्या टोळीचा मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव पाण्डेय यांनी तयार करुन अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. याबाबत त्यांनी चौकशी करत या प्रस्तावास मंजुरी देत मोक्का कायद्यान्वये विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.यांच्यावर चालणार 'मोक्का'नुसार खटलामुख्य सुत्रधार व टोळीप्रमुख सागर सुरेश म्हस्के उर्फ सोनु पाईकराव याच्यासह रोहीत सुरेश लोंढे उर्फ भु-या, जय उर्फ वाल्मीक घोरपडे, राहुल भारत तेलोरे, कलाम सलिम राईन, सत्तु भैरु राजपुत, हर्ष सुरेश म्हस्के, जॉन चलन पडेची, योगेश श्रावण बोडके, साहील सुरेश म्हस्के, अमन हिरालाल वर्मा, अक्षय राजेंद्र पारचे, बाबु मनियार उर्फ संदिप सुंदरलाल, शिबन शफी शेख, अनुज हरबिर बेहनवाल, गोलु जेसुला बाबु, आतिश वामन तायडे, बॉबी उर्फ हर्ष किशोर बाबु, अजय राजेंद्र लोहट यांच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांवर आता मोक्कानुसार खटला चालणार आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक