उपकेंद्र सहायक पदासाठी १२ मे पासून छाननी
By Admin | Updated: May 9, 2014 23:42 IST2014-05-09T22:48:14+5:302014-05-09T23:42:55+5:30
नाशिक- महापवितरणच्यावतीने घेण्यात येत असलेल्या उपकेंद्र सहायक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून नाशिक परिमंडळातील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया दि. १२ ते २० पर्यंत नाशिक परिमंडळ कार्यालय येथे होणार आहे.

उपकेंद्र सहायक पदासाठी १२ मे पासून छाननी
नाशिक- महापवितरणच्यावतीने घेण्यात येत असलेल्या उपकेंद्र सहायक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून नाशिक परिमंडळातील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया दि. १२ ते २० पर्यंत नाशिक परिमंडळ कार्यालय येथे होणार आहे.
भरतीतील उमेदवारांची निवड सूची दि. ५ मे रोजीच महावितरणच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आलेली आहे. परिमंडळातील निवड झालेल्या २७१ उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची छाननी दि १२ ते २० पयंर्त केली जाणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ५.३० यावेळेत ही छाननी प्रक्रिया पुर्ण केली जाईल. सदर छाननी प्रक्रिया महावितरणच्या नाशिकरोड येथील परिमंडळ कार्यालयात होणार असल्याची माहिती महवितरणच्यावतीने कळविण्यात आलेली आहे.