वैतरणानगर येथे विज्ञान सप्ताहात गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 00:31 IST2021-03-15T19:21:05+5:302021-03-16T00:31:39+5:30

वैतरणानगर : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित विज्ञान सप्ताहात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Science week honors at Vaitarnanagar | वैतरणानगर येथे विज्ञान सप्ताहात गुणवंतांचा गौरव

वैतरणानगर येथे विज्ञान सप्ताहात गुणवंतांचा गौरव

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना पारितोषिक...

वैतरणानगर : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित विज्ञान सप्ताहात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे निर्माण होणाऱ्या संशोधनामुळे मानवाच्या आणि समाजाच्या गरजा पूर्ण होत आहेत. असे असले तरीही काही नवसंशोधनाचे दुष्परिणाम मानवी जीवन आणि आरोग्यावर होत आहे.

अशा संशोधनाचा वापर करण्यासंबंधीचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे भारतीय साधुसंत, विचारवंत आणि समाजसुधारकांच्या विचारांना अनुसरून समाजहिताय वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मविप्र समाज संस्थेचे संचालक भाऊसाहेब खातळे यांनी केले. के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयराज आहेर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविण्यासाठी विज्ञान कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत, असे नमूद केले. याप्रसंगी पोस्टर सादरीकरण, वस्तुनिष्ठ प्रश्नमंजूषा आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी महाविद्यालय राबवित असलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढीपरंपरा नष्ट करण्यासाठी विज्ञान मंचाची आवश्यकता प्रतिपादन केली. प्रास्ताविक प्रा. एल. डी. देडे यांनी तर परिचय डॉ. डी. डी. लोखंडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. नाझिया मणियार व कु. कांचन इंदोरिया यांनी केले. आभार प्रा. एस. ए. हांडगे यांनी मानले.

कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. यू. एन. सांगळे, डॉ. आर. एम. गवारे, प्रा. के. के. चौरासिया, प्रा. सानप, प्रा. जे. एस. जाधव, प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. ए. बी. धोंगडे, प्रा. के. पी. बिरारी, प्रा. श्रीमती पवार, प्रा. श्रीमती डुगजे, प्रा. राहाणे, प्रा. गांगुर्डे, प्रा. सी. डी. चौधरी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना पारितोषिक...
पोस्टर सादरीकरण सुवर्णा राव (प्रथम), भाग्यश्री सोनार (द्वितीय), पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेत आकाश अटकरी (प्रथम), दामिनी शिरसाट (द्वितीय), रसायनशास्त्र प्रश्नमंजूषा स्पर्धेत ऋषिकेश धुमाळ (प्रथम), अनिकेत बागडे (द्वितीय), तर विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेत लव्हायझर टीम (प्रथम), आर्यभट्ट टीम (द्वितीय) या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.

Web Title: Science week honors at Vaitarnanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.