शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

ठराविक दुकानातूनच वस्तू खरेदीचा शाळांचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:45 AM

नाशिकरोड, एकलहरे, जेलरोड येथील बहुतेक शाळांनी विशिष्ट दुकानातूनच शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती केल्यामुळे दुकानात पालकांची पाल्यांसह प्रचंड गर्दी होत असून, जागा कमी आणि गर्दी मोठी यामुळे ग्राहकांना तासन् तास ताटकळत दुकानाबाहेर उभे रहावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

एकलहरे : नाशिकरोड, एकलहरे, जेलरोड येथील बहुतेक शाळांनी विशिष्ट दुकानातूनच शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती केल्यामुळे दुकानात पालकांची पाल्यांसह प्रचंड गर्दी होत असून, जागा कमी आणि गर्दी मोठी यामुळे ग्राहकांना तासन् तास ताटकळत दुकानाबाहेर उभे रहावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.नाशिकरोड, जेलरोड, सिन्नरफाटा, सायखेडारोड, एकलहरे परिसरात अनेक मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्या शाळांतील विद्यार्थ्यांचा ठराविक रंगाचा गणवेश खरेदी करण्यासाठी जेलरोडवरील एका ठराविक दुकानातूनच गणवेश खरेदी करण्याचा आग्रह शालेय व्यवस्थापनाने पालकांना केली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव आपल्या पाल्याला घेऊन पालक त्या दुकानात खरेदीसाठी जात असून, दुकानाचा आकार पाहता एकावेळी ८ ते १० ग्राहक आतमध्ये पाल्यासह जाऊन खरेदी करू शकतात. मात्र प्रत्येकालाच घाई असल्याने जास्तीत जास्त ग्राहक दुकानात शिरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे धक्काबुक्की होत असून, त्याचा फटका महिला व लहान मुलांना बसत आहे. महिलांची तर अक्षरश: कुचंबना होत असून, त्यांना पाल्यांना कडेवर घेऊन दुकानाबाहेर तासन् तास उभे रहावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे पालक वैतागले असून, विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांच्या विरोधात तक्रार करण्याची तयारी चालविली आहे.नाशिकरोड, एकलहरे परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा ठराविक दुकानातूनच शालेय गणवेश खरेदी करण्याचा आग्रह करतात. त्यामुळे सर्वसामान्य पालकांचा वेळ व पैसा खर्च होतो. एका ठराविक दुकानातूनच गणवेशाची खरेदी करण्यामागे संस्था व शाळाचालकांचे आर्थिक हितसंबंध असल्याची शंका येते. हे वेळीच थांबले नाही तर समता परिषद व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडले जाईल.- शानू निकम, अध्यक्ष, समता परिषद

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी