शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाचनाची आवड रुजविण्यासाठी शाळेने साकारले १८० फुट लांबीच्या रेल्वेत ग्रंथालय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 14:18 IST

लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी असून यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फुट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रुजण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवाचनाची आवड रुजविण्यासाठी रेल्वेत साकारले ग्रंथालय नाशिकमधील इस्पॅलियर शाळेचा अनोखा उपक्रम

नाशिक : लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी असून यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फुट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रुजण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला आहे.शिक्षण अभ्यासक तथा शाळेचे प्रमुख सचिन जोशी यांच्या संकल्पनेतून ही रेल्वे लायब्ररी तयार करण्यात आली असून या रेल्वेचे डिझाईन यतीन पंडित यांनी केले असून शाम लोंढे यांनीही डिझाईन आणि निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले. टाकाऊ तून टिकाऊ संकल्पनेतून ही रेल्वे लायब्ररी तयार करताना जुन्या लोखंंडाचा वापर करण्यात आला आहे.  या ग्रंथालयाचे उदघाटन आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते झाले. यावेळी नंदलाल काळे, डॉ. प्राजक्ता जोशी, कुमुदिनी बंगेरा यांच्यासह राजलक्ष्मी बँकेचे संचालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रसन्न वातावरणात अभ्यास करता यावा आणि वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून या आगळया वेगळया लायब्ररीची निर्मिती करण्यात आल्याचे सचीन जोशी यांनी सांगितले. या रेल्वे लायब्ररीला ‘मोहन टू महात्मा’ असे नाव देण्यात आले आहे. या रेल्वेमध्ये चाळीस विद्यार्थी ऐका वेळेस पुस्तके वाचू शकतात. किमान चार हजार पुस्तक त्यात ठेवण्यात आली आहे. तसेच प्रोजेक्टरची ही व्यवस्था करण्यात आली आहे.

लिम्का बूकमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न  रेल्वेतील ग्रथालयाची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणीसाठीही प्रयत्न केले जाणार आहे. जपानमध्ये रेल्वेच्या डब्यांमध्ये भरणाऱ्या शाळेविषयी  वाचले होते.त्यानंतर रेल्वेच्या डब्यामध्ये लहान मुलांच्या पुस्तकांचे ग्रंथालय सुरू करण्याचा विचार आला आणि विंटेज रेल्वेतील ग्रंथालय शाळतील सर्वांच्या  प्रयत्नाने उभे राहिल्याचे सचिन जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकSchoolशाळाlibraryवाचनालयStudentविद्यार्थी