शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
3
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
4
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
5
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
6
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
7
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
9
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
10
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
11
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
12
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
13
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
14
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
15
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
16
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
17
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
18
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
19
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
20
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

नाशकात चाळीस तलाठ्यांची भरली ‘शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:32 PM

गेल्या आठ दिवसांपासून तलाठी व मंडळ अधिकारी सजेवर जात नसल्याने गावोगावचे कार्यालये ओस पडली असून, शासकीय कामकाजासाठी तलाठी सापडत नसल्याने त्याचा फटका सामान्य नागरिक व शेतक-यांना बसू लागला आहे.

ठळक मुद्देसातबारा : नाशिक तालुक्यातील तलाठी कार्यालये ओस पायाभुत सुविधा देण्यात शाासनानेच हात अखडता घेतला

नाशिक : जानेवारी महिन्यापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याची घोषणा राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली असली तरी, नाशिक जिल्ह्याचे काम अद्यापही अपुर्ण असून, ते पुर्ण करण्यासाठी नाशिक तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाºयांची दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शाळाच भरू लागली आहे. आॅनलाईन प्रणालीने सातबारा उता-याचे ‘रि-ईडीट’चे काम करतांना येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर होत नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून तलाठ्यांनी आॅफलाईन कामकाज सुरू केले असून, ते कितपत यशस्वी होईल याविषयी साशंकता आहे.दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून तलाठी व मंडळ अधिकारी सजेवर जात नसल्याने गावोगावचे कार्यालये ओस पडली असून, शासकीय कामकाजासाठी तलाठी सापडत नसल्याने त्याचा फटका सामान्य नागरिक व शेतक-यांना बसू लागला आहे. तथापि, जनतेच्या त्रासाविषयी देणे-घेणे नसलेल्या प्रशासन व्यवस्थेने तलाठ्यांना पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे कानाडोळा केल्यानेच ही परिस्थिती उद्भवली आहे. संगणकीय सातबारा उतारा देण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असला तरी, त्यासाठी पायाभुत सुविधा देण्यात शाासनानेच हात अखडता घेतला आहे. प्रारंभी सदरचे काम करण्यास नाखुष असलेल्या तलाठ्यांनी संगणकीय सातबारा उता-याचे कामकाज सुरू केल्यानंतर त्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. सॉफ्टवेअरमधील दोष दुर करण्यात बराच कालावधी उलटल्यानंतर सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार घडल्याने तलाठ्यांना मध्यरात्री उठून कामे करावी लागली. परंतु तरिही हा प्रश्न अजुनही सुटलेला नाही.नाशिक तालुक्यात सर्वाधिक सुमारे सव्वा दोन लाख खातेदार असून, त्यांच्या सातबा-याचे संगणकीकरणाचे काम झाले आहे, मात्र त्यातील चुका दुरूस्त करण्याचे काम सध्या ‘रि-ईडीट’ मॉड्युलमध्ये सुरू आहे. आॅनलाईन प्रणालीने सदरचे काम करावे लागत असले तरी, त्यासाठी इंटरनेटचा स्पीड व सर्व्हरचा प्रश्न कायम असल्यामुळे नाशिक तालुक्याचे दहा टक्केही कामकाज झालेले नाही. अशा परिस्थितीत तलाठी व मंडळ अधिका-यांना शासनाच्या महसुलाशी संबंधित सर्व कामे बाजुला सारून निव्वळ सातबारा संगणकीकरणाच्या कामात जुंपण्यात आले असून, ४२ तलाठी व ८ मंडळ अधिकारी दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उप विभागीय अधिका-यांच्या कार्यालयाच्या वरच्या सभागृहात लॅपटॉपवर कामे करीत आहेत. आॅफलाईन पद्धतीने काम करीत असतानाही दिवसभरातून जेमतेत वीस ते पंचवीस सातबारा उता-याचेच काम पुर्ण होत आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक