शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

राज्यात शंभर आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 16:28 IST

नाशिकमध्ये कार्यक्रम : शतायुषी संस्था संवाद संमेलनाचे उद्घाटन

ठळक मुद्देपहिली शाळा नंदुरबार येथे सुरू करण्यात येईलनाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त शतायुषी संस्था संवाद संमेलनाचे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते

नाशिक : जागतिक पातळीवर आपल्या विद्यार्थ्यांची ओळख निर्माण होण्यासाठी राज्यात आंतराष्ट्रीय पातळीवरील पद्धतीचे शिक्षण देणा ऱ्या  १०० आंतराष्ट्रीय शाळा सुरू केल्या जातील. त्यामधील पहिली शाळा नंदुरबार येथे सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण आणि  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुक्त विद्यापीठात आयोजित शतायुषी संस्था संमेलनात बोलताना केली.नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त शतायुषी संस्था संवाद संमेलनाचे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी तावडे यांनी सांगितले, शिक्षण व्यवस्थेत बदल स्वीकारण्यासाठी मोकळेपणा स्वीकारण्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील विकास व बदलांसाठी वेगळे मार्ग चोखाळणा ऱ्या शिक्षण संस्थांच्या मागे शासन भक्कमपणे उभे राहील. राज्यातील जुन्या व जास्त शाळा असण ऱ्या संस्थांना माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यासाठी स्वायत्तता देण्याचा विचार असून, मुंबईसारख्या महानगरातील नामांकित शाळांतील विद्यार्थी व दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना एकाच पातळीवरील परीक्षा देण्याची यामुळे गरज राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. शाळांमधील बिगर शिक्षक कर्मचा ऱ्याची पदभरतीसाठी विद्यार्थी संख्या हा निकष ठरविण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी संस्थांना मर्यादित स्वरूपात अधिकार असतील. शासनाने राज्यस्तरावर निवड केलेल्या यादीतील शिक्षकांना मुलाखतीद्वारे ते नियुक्ती देऊ शकतील. यावेळी शिक्षकांना देण्यात येणारी शाळा बाह्य कामे दिली जाऊ नयेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना विविध प्रसंगांच्या निमित्ताने प्रभात फे ऱ्याच्या माध्यमातून रस्त्यांवर उपक्र मांसाठी सहभागी करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत, असे तावडे यांनी सांगितले. याप्रसंगी महेश दाबक यांनी प्रास्ताविक केले. तसेच डॉ. काकतकर, श्रीमती करंदीकर यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलत्या परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या गरजा, पालकांच्या अपेक्षा आदींबाबत विचार व्यक्त केले. यावेळी तावडे यांनी उपस्थितांशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, कार्याध्यक्ष महेश दाबक, शिक्षणतज्ज्ञ सुमनताई करंदीकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेNashikनाशिक